शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता अनेक वाचक-गुंतवणूकदारांना कुठून या शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि फसलो असे वाटत असेल. एकीकडे शेअर बाजार निर्देशांक १९ हजारांवर असूनही आपलेच शेअर का पडतात, असाही प्रश्न अनेकांना पडणे शक्य आहे. पडत्या बाजारात किंवा मंदीत हिम्मत दाखवून केलेली खरेदी फायद्याची ठरते, परंतु अजून बाजार किती खाली जाणार याचा अंदाज येणे कठीण झाले आहे. म्हणूनच अशा वेळी एफएमसीजी किंवा औषधी कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी विचार करावा. मंदीचा परिणाम या कंपन्यांवर इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी होतो. अर्थात कुठलीही एफएमसीजी किंवा औषधी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य असा याचा अर्थ नव्हे. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही हेच खरे. मागील काही लेखांत म्हटल्याप्रमाणे आíथक निष्कर्ष तपासताना केवळ नक्त नफा किती वाढलाय ते न पाहता त्याच बरोबर कंपनीची कर्जे, व्याज खर्च आणि अपवादात्मक नफा/तोटादेखील पाहावा.
ल्ल  सिप्ला ही भारतातील एक नावाजलेली अग्रगण्य औषधी कंपनी असून गेल्या ७७ वर्षांत तिने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावले आहे. सिप्लाची एकंदर ३४ उत्पादन केंद्रे असून त्यांना अनेक देशांतील नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, डब्लूएचओ इ.चा समावेश होतो. गेल्या आíथक वर्षांत सुमारे ८२०२ कोटी रुपयांची उलाढाल करणारी सिप्ला ही आघाडीची निर्यात प्रधान कंपनी असून, एकूण उलाढालीपकी सुमारे ५३% उलाढाल ही १८० देशांतील निर्यातीची आहे. परदेशात मानाचे स्थान टिकवण्यासाठी कंपनीने अनेक देशांत भागीदारीचे करार केले आहेत, त्यापकी २२ करार केवळ अमेरिकेतील आहेत. गेल्या दोन वर्षांत कंपनीने इंदूरमधील सेझमध्ये उत्पादन सुरू करण्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील सिप्ला मेडप्रो ही कंपनी ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. गेल्या आíथक वर्षांत कंपनीची कामगिरी तितकीशी समाधानकारक नसली, तरीही कंपनीच्या व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे येत्या दोन वर्षांत कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या आíथक वर्षांपासून कंपनीने संशोधनावरचा खर्चदेखील वाढवून तो विक्रीच्या ५-५.५% करायचा ठरविले आहे.

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ३६.८
परदेशी गुंतवणूकदार    २३.९
बँका / म्युच्युअल फंडस्    १५.७
सामान्यजन  व इतर    २३.६

सिप्ला लिमिटेड
सद्य बाजारभाव     रु. ३९९.९०
प्रमुख व्यवसाय    औषधी, फॉम्र्युलेशन्स
भरणा झालेले भाग भांडवल     रु. १६०.५८ कोटी
पुस्तकी मूल्य      रु.  ११०.४     
दर्शनी मूल्य      रु. २
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    रु. १८.६
किंमत उत्पन्न गुणोत्तर  (पी/ई)    २१.६ पट
बाजार भांडवल :   रु. ३२१९२ कोटी    बीटा : ०.५
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     : रु. ४३५/ रु. ३२४