दीर्घकालीन फायद्यासाठी योजलेली शिस्तबद्ध गुंतवणूक सध्या भांडवली बाजारातील घातक उतारांची धास्ती घेऊन मोडता कामा नये. शेअर बाजाराचे वर-खाली होणे स्वाभाविक आहे. आर्थिक उद्दिष्ट दूरचे असलेल्या गुंतवणूकदारांनी अशा प्रासंगिक प्रतिक्रियांकडे धीराने दुर्लक्ष करणेच हितावह ठरेल.

नवीन गुंतवणूकविषयक माहिती : एल अ‍ॅण्ड टी इमर्जिग  अपॉर्च्युनिटीज फंड 

* हा फंड नवीन गुंतवणुकीसाठी (२९ जानेवारीपासून) १२ फेब्रुवारीपर्यंत खुला आहे. या काळात गुंतवणूकदारांना युनिट्स १० रुपये दराने मिळतील. क्लोज एन्डेड फंड असल्यामुळे लिस्टिंगनंतर युनिट्सची खरेदी-विक्री शेअर बाजाराच्या मार्फत करता येईल. त्यामुळे दलालीचा खर्च लागेल. युनिट्सची खरेदी-विक्री किंमत एनएव्हीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.

* मुदत कालावधी – १,१५१ दिवस. या कालावधीनंतर गुंतवणूकदारांना पैसे तेव्हाच्या एनएव्हीनुसार परत दिले जातात, दुसऱ्या फंडामध्ये वळविले जातात किंवा फंड मुदतमुक्त (ओपन एन्डेड) केला जातो.

*  किमान गुंतवणूक – रु. ५,००० (एसआयपी करता येत नाही)

*  जोखीम – जास्त

*  गुंतवणूक उद्दिष्ट – दीर्घकालीन भांडवलवृद्धी

*  गुंतवणूक धोरण – प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांचे समभाग आणि डेरिव्हेटिव्हज्.

* फंड मॅनेजर – विहंग नाईक, एकूण ११ वर्षांचा अनुभव. एल अ‍ॅण्ड टी समूहाबरोबर जुलै २०१२ पासून कार्यरत. त्याआधी एमएफ ग्लोबल सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज आणि एसबीआय कॅप सिक्युरिटीजमध्ये रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून कार्यरत होते.

त्यांचे सध्या चालू असलेले फंड १) एल अ‍ॅण्ड टी मिड कॅप फंड, जून २०१६ २) एल अ‍ॅण्ड टी लाँग टर्म अ‍ॅडव्हान्टेज फंड १, ऑक्टोबर २०१६

* कुणासाठी योग्य – जास्त जोखीम घेऊन दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या प्रकारच्या फंडामध्ये रोकड सुलभता कमी असते. शिवाय फंड कालावधी पूर्ण व्हायच्या आधी युनिट्स विकून फायदा कमावण्यासाठी ब्रोकिंग खाते लागते. शक्यतो जे पैसे फंड कालावधीत लागणार नसतील तेच अशा क्लोज एन्डेड फंडामध्ये गुंतवावेत. फंड कालावधीच्या अखेरीस फंडाला फायदा झालेला असेलच असे नाही. जर फंड तोटय़ात असेल तर गुंतवणूकदारालासुद्धा तोटा सहन करावा लागेल.

(लेखिका सनदी लेखाकार आणि लोकांच्या वित्तीय स्वास्थ्यविषयक तज्ज्ञ आणि स्वतंत्र सल्लागार म्हणून कार्यरत) 

trupti_vrane@yahoo.com

सूचना: हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

*  या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.

*  सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.

*  यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले  जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

*  गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.

तृप्ती राणे