डॉ. आशीष थत्ते

पाककृती (बिल्स ऑफ मटेरिअल्स)  ‘बिल्स ऑफ मटेरिअल्स’चे मराठी भाषांतर खरे तर साहित्याची तयारी किंवा नुसते साहित्य म्हणून सुद्धा चालले असते. पण खरे तर जेव्हा त्याची तुलना घरातील किंवा दैनंदिन गोष्टींची करायची असते, तेव्हा त्याचे पाककृती असे भाषांतर ठीक वाटते. कंपन्या पाककृती कशा वापरतात?  कुठलीही वस्तू जेव्हा प्रकल्पात तयार होते, तेव्हा विशिष्ट उत्पादन घटकांपासूनच तिला बनविले जाते. ज्या वस्तू मोठय़ा प्रमाणात प्रकल्पामध्ये बनविल्या जातात, जसे कागद, संगणक किंवा अगदी चमचे-ताटे काहीही घ्या. या सगळय़ांची एक पाककृती असते. म्हणजे किती प्रमाणात केवढा कच्चा माल वापरायचा याचे प्रमाण ठरलेले असते. एक साबण बनवताना किंवा लाखो साबणाच्या वडय़ा बनविताना त्या एकसारख्याच बनल्या पाहिजेत. त्यामुळे त्यात वापरले जाणारे साहित्याचे एकमेकांशी असणारे प्रमाणदेखील नेहमीच सारखे असले पाहिजे. हे कधी शक्य होते जेव्हा एक पाककृती किंवा ‘बिल्स ऑफ मटेरिअल्स’ बनवून त्याप्रमाणे वस्तू बनवणाऱ्या यंत्रात कच्चा माल टाकला तर ते शक्य असते. जेव्हा एका उद्योगाचा पक्का माल दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असतो तेव्हा तर याला अनन्यसाधारण महत्त्व असते. बहुराष्ट्रीय कंपन्या या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय असतात आणि भारतीय कंपन्या देखील हल्ली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत. उत्पादित झालेल्या वस्तू उत्पादन जे बाजाराने मान्य केले आहे त्या प्रमाणे येते व वस्तूंचा खप होतो. सर्व कंपन्यांच्या दृष्टीने ही एक गोपनीय गोष्ट असते आणि सहसा तर लेखापालाला देखील दाखवली जात नाही. थोडक्यात काय तर कुठला कच्चा माल वापरला जातो व कच्च्या मालाचे एकमेकांशी असणारे प्रमाण हे महत्त्वाचे असते. आपल्या स्वयंपाकघरात देखील सारखीच परिस्थिती असते. घरात पुरणपोळी किंवा चिकन बिर्याणी बनवायची म्हणजे एक पाककृती असते आणि गृहिणी त्या आपल्या गोपनीय पाककृतीला सहसा घराबाहेर जाऊ देत नाहीत. प्रत्येक पदार्थ हा एका विशिष्ट पाककृती प्रमाणेच बनतो व त्यातील वस्तूंचे एकमेकांशी असणारे प्रमाण हे त्या पदार्थाची चव, रंग आणि इतर सौंदर्य ठरवतात. घरातील महिला तर त्याची पाककृती लिहून देखील ठेवतात किंवा मग तरला दलाल यांची पुस्तके वाचून पदार्थ बनविले जातात.

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

थोडक्यात, पाककृती दोन्हीकडे असते. घरात थोडी अनौपचारिक पण कंपन्यांमध्ये व्यवस्थित लिहिलेली आणि बरीच गोपनीय राखली जाते. जेव्हा एखादा कच्चा माल नाही किंवा आवश्यकतेपेक्षा थोडा कमी असेल त्यावेळी खरी गंमत होते. त्या विषयी पुढील लेखात माहिती घेऊ या.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail.com