आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात अवघ्या तीन दिवसांत निफ्टी निर्देशांकावर ६०० अंशांच्या तेजीमुळे, मरगळलेल्या, उदास मनाचे रूपांतर एकदम ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा प्रसन्न, उल्हसित वातावरणात रूपांतरित झाले. हे वातावरण गुरुवारचा अपवाद वगळता सप्ताहाअखेपर्यंत टिकले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या. 

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५९,७४४.६५

निफ्टी : १७,८१२.७०

निफ्टी निर्देशांकाने २० डिसेंबरला १६,४१० चा नीचांक नोंदवत ७ जानेवारीला १७,९०५ चा दिवसांतर्गत उच्चांक नोंदविला. अवघ्या १४ कामकाज दिवसांत १,४९५ अंशांची वाढ. या  अतिजलद वाढीला ‘भूमिती श्रेणीतील वाढ’ असे संबोधतात.

आता भूमिती श्रेणीतील वाढ म्हणजे काय? ते समजून घेऊ या.

संख्याशास्त्रात (स्टॅटिस्टिक्स) गणिती श्रेणीतील वाढ (अरेथमॅटिकल प्रोग्रेशन – एपी) व भूमिती श्रेणीतील वाढ (जॉमेट्रिकल प्रोग्रेशन – जीपी) शिकवली जाते. यात जी वाढ होत आहे त्याचे स्वरूप सांगितल जाते. जी वाढ संथ गतीने पाया रचत, रोवत होते ती दीर्घकाळ टिकते आणि त्यात उत्तरोत्तर वाढच होत राहते. याच्या बरोबर विरुद्ध अल्पावधीत दुप्पट वाढ.

वरील संकल्पना समजून घेण्यासाठी बाल साहित्यातील ‘ससा आणि कासवाच्या’ शर्यतीच्या गोष्टीचा आधार घेऊ या. गणिती श्रेणीतील वाढीसाठीच्या उदाहरणासाठी भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे अन्नधान्याचे उत्पादन भले कमी होते, पण त्यात सातत्य व वृद्धी होती. (१९७० ते १९७२ च्या दुष्काळाचा कालावधी वगळता) गेल्या ७५ वर्षांत अन्नधान्याच्या उत्पादनात जी प्रगती झाली ती नेत्रदीपक आहे. यात कालावधी आणि वृद्धी यांची सांगड घातली जाते. याच्या बरोबर उलट बोगस वित्तीय कंपन्यांच्या अल्पावधीत ‘दामदुप्पट योजना’. या योजनांचे नंतर काय होते ते आपणा सर्वानाच माहिती आहे.

आता आपण ही संकल्पना निफ्टी निर्देशांकावर अमलात आणू या.

निफ्टी निर्देशांकावर १४ कामकाज दिवसांत १,४९५ अंशांची जी वाढ झाली ती अतिजलद, पाया न रचता झालेली भूमिती श्रेणीतील वाढ आहे. जी भविष्यात घातक उतारास कारणीभूत ठरते. हे टाळायचे असल्यास, निफ्टी निर्देशांकांने १७,७०० च्या दरम्यान थोडी विश्रांती घेऊन, या स्तरावर पायाभरणी करत संथ गतीने १८,००० ते १८,३०० चे वरचे लक्ष्य साध्य करावे. हे वरचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर पुन्हा १७,५०० पर्यंत घसरण होऊन, नंतर निफ्टी निर्देशांकांने १८,९०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालावी. या गणिती श्रेणीतील वाढीत सर्व गुंतवणूकदारांना सहभागी होता येईल, अन्यथा निफ्टीला आवडणाऱ्या ‘भूमिती श्रेणीतील’ अतिजलद वाटचालीचा निफ्टीने पुन्हा अवलंब केल्यास, निफ्टी निर्देशांक १७,९०० वरून १८,९०० झाल्यास पुन्हा १९ ऑक्टोबरच्या १८,६०० च्या उच्चांकावरून घसरणीच्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची शक्यता आहे. 

निकालपूर्व विश्लेषण

इन्फोसिस लिमिटेड 

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ जानेवारी 

७ जानेवारीचा बंद भाव – १,८१३.१५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,७७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,७७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०३०  रुपये

ब) निराशादायक निकाल : १,७७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,६७० रुपयांपर्यंत घसरण

टीसीएस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ जानेवारी        

७ जानेवारीचा बंद भाव – ३,८५४.८५ रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,७५०रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,२०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,७५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,६०० रुपयांपर्यंत घसरण.

विप्रो लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार,१२ जानेवारी        

७ जानेवारीचा बंद भाव – ७११.२० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ६६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७४० रुपये, द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५९० रुपयांपर्यंत घसरण.

एचडीएफसी बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल -शनिवार, १५ जानेवारी         

७ जानेवारीचा बंद भाव- १,५५०.४० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर -१,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७२५  रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,५०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,४०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.