आशीष ठाकूर

गेल्या लेखात सूचित केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकावरील तेजीची कमान ही १७,००० च्या स्तरावर आधारलेली आहे. सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी १७,००० च्या स्तराला हलकासा तडा गेल्याने सर्वत्र भीतीयुक्त चिंतेचे वातावरण पसरले होते. पण सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सुधारणेतून थोडय़ा आशा पल्लवित झाल्या. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.     

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या भरीव सुधारणेमुळे मंदी आता सरत आली असून, दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत बाजारात तेजीचे वातावरण असेल, असे मनाचा एक कोपरा सांगतो. तर जागतिकीकरणामुळे आर्थिक विश्व हे आता वसुधैव कुटुंबकम् बनले असल्यामुळे इतर देशांतील आर्थिक समस्या यांचा आपल्यावरदेखील कमी-अधिक प्रमाणात परिणाम होणार असल्याने भांडवली बाजारातील सुधारणा या क्षणिक स्वरूपाच्या असतील.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५७,९१९.९७ 

निफ्टी : १७,१८५.७०

तेजी-मंदीच्या हिंदूोळय़ावरील नाण्याच्या दोन्ही बाजू तांत्रिक विश्लेषणाचा आधारे समजून घेऊया

या घडीला निफ्टी निर्देशांकावर १७,६०० हा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर असेल. निफ्टी निर्देशांकावर ३०० अंशांचा परीघ निर्माण झाला आहे जसे की – १७,००० ते १७,३०० आणि १७,३०० ते १७,६००. पुढे निर्देशांक १७,६०० च्या स्तरावर सातत्याने पाच दिवस टिकल्यास १७,९०० ते १८,२०० ही वरची लक्ष्य दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात तेजीच्या फटाक्यांची आतषबाजी करणारी ठरतील. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांक १७,४०० ते १७,६०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरत असल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १७,००० ते १६,७०० आणि दुसरे खालचे लक्ष्य १६,४०० ते १६,१०० असे असेल.

निकालपूर्व  विश्लेषण

१) एसीसी लिमिटेड 

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १७ ऑक्टोबर     

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – २,२४३.६५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,२२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,२२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,५५० रुपये..

ब)निराशादायक निकाल : २,२२५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,०६० रुपयांपर्यंत घसरण.

२)  केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, १८ ऑक्टोबर   

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – ६६९.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ६४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७२० रुपये, द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ६४० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६०० रुपयांपर्यंत घसरण.

३) अ‍ॅक्सिस बँक 

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० ऑक्टोबर       

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – ८००.५० रु 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८१५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७९० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७६० रुपयांपर्यंत घसरण.

४) अंबुजा सिमेंट लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २१ऑक्टोबर    

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – ५०१.८५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४८५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ५५० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ४८५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४५० रुपयांपर्यंत घसरण.

५)  आयसीआयसीआय बँक

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, २२ ऑक्टोबर   

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – ८७०.२५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८९० रुपये, द्वितीय लक्ष्य ९२५ रुपये.

ब)निराशादायक निकाल : ८७५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ८४० रुपयांपर्यंत घसरण.

६) आयडीएफसी फस्र्ट बँक  

तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २२ ऑक्टोबर       

१४ ऑक्टोबरचा बंद भाव – ५४.३० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६० रुपये, द्वितीय लक्ष्य ६८ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४६ रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com