आशीष ठाकूर

पृथ्वी जशी आपल्या ‘आसा’भोवती फिरते तसेच काहीसे सध्या निफ्टी निर्देशांकाबाबत घडत आहे. निफ्टी निर्देशांक ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमा करत आहे. जसे की, २५ जानेवारीला १६,८०० चा नीचांक नोंदविल्यानंतर, ३०० अंशांचा फेर धरत १६,८०० अधिक ३०० अंश १७,१००, पुढे १७,४००, १७,७०० (२ फेब्रुवारीचा क्षणिक उच्चांक १७,७९४) असे निफ्टी निर्देशांकाचे मार्गक्रमण काळाच्या कसोटीवर उतरलेले होते. हा जुना मार्ग पुन्हा चोखाळत निफ्टी निर्देशांकाने १४ फेब्रुवारीला १६,८०० चा नीचांक नोंदवत सुधारणा सुरू झाली.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार

सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी १७,४००च्या समीप, १७,३८० चा उच्चांक निफ्टीने नोंदविला आणि आपली ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमा पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५७,८३२ .९७

निफ्टी : १७,२७६.३० 

येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,१०० ते १७,००० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे १७,४०० व द्वितीय लक्ष्य १७,७०० असे असेल. गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकावर १७,६०० ते १७,८०० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ आहे, किंबहुना ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ आहे.

निफ्टी निर्देशांक १७,८०० च्या स्तरावर सातत्याने टिकल्यास निफ्टी निर्देशांक १८,००० ते १८,३०० च्या स्तराला गवसणी घालेल. ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याच्या  दुसऱ्या बाजूचा विचार करता, निफ्टी निर्देशांकाने १७,६०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरत, १७,००० चा स्तर तोडल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १६,७०० ते १६,४०० असे असेल. या मंदीची आर्थिक, मानसिक तयारी ठेवायला हवी.

निकालपूर्व विश्लेषण

१) मिहद्र सीआयई ऑटोमोटिव्ह

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – २००.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल :समभागाकडून १९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २२० रुपये, द्वितीय लक्ष्य २४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १९० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १६० रुपयांपर्यंत घसरण.

२) सॅनोफी इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २३ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – ७,२९८.१५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल :  ७,२०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६,९५० रुपयांपर्यंत घसरण.

३)केएसबी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २४ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – १,०७६.२० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,०५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,०५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ९०० रुपयांपर्यंत घसरण.

४) लिंडे इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल -गुरुवार, २४ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – २,७००.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल :समभागाकडून २,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,८५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,१५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,५५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,३०० रुपयांपर्यंत घसरण.

५)  वेस्युवीयस इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २४ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – १,१४७.४५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,१३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३५०रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,१३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,०२० रुपयांपर्यंत घसरण.

६) रेन इंडस्ट्रीज लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार,२५ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारीचा बंद भाव – २२७.९५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५१५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५० रुपये, द्वितीय लक्ष्य २७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : २२५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक, ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.