अजय वाळिंबे

तानला प्लॅटफॉम्र्स लिमिटेड म्हणजेच पूर्वाश्रमीची तानला सोल्यूशन्स लिमिटेड. हैदराबाद येथे कार्यरत असलेली ही कंपनी क्लाउड कम्युनिकेशन स्पेसमध्ये मूल्यवर्धित सेवा देते. यांत प्रामुख्याने दूरसंचार पायाभूत सुविधा, दूरसंचार सेवा (उत्पादने आणि कस्टम डेव्हलपमेंट), ऑफशोअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स इ. चा समावेश होतो. दूरसंचार क्षेत्रात जगभरातील ग्राहकांना सेवा पुरविणारी एंड-टू-एंड सोल्यूशन्स कंपनी म्हणून तानला ओळखली जाते. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स तसेच वायरलेस जगासाठी एकात्मिक उपाय आणि उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतातील पहिल्या काही कंपन्यांपैकी तानला प्लॅटफॉम्र्स गणली जाते. गेल्या काही वर्षांत कंपनीने मोठी प्रगती केली असून दोन कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

कंपनी जगातील सर्वात मोठय़ा सीपास (सीपीएएएस) सेवा प्रदात्यांपैकी एक असून आहे, खासगी, सुरक्षित आणि विश्वासार्ह अनुभव देणारे जागतिक एज-टू-एज नेटवर्कसह एंटरप्राइजेस आणि पुरवठादारांसाठी डिजिटल मार्केटप्लेस प्रस्तुत करते. तसेच दरवर्षी ८०० अब्जाहून अधिक परस्पर संवादांवर प्रक्रिया करते. याकरिता कंपनीने ‘वाइजली’ हा एक कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. भारतातील सुमारे ७० टक्के ‘ए२पी / एसएमएस’ ट्रॅफिक त्याच्या वितरित लेजर प्लॅटफॉर्मवरून होत असल्याने तानला ही जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन वापर करणारी कंपनी आहे.

अत्यल्प कर्ज असणाऱ्या या कंपनीने गेल्या १० वर्ष सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. डिसेंबर २०२१ चे आर्थिक निष्कर्ष देखील त्याला अपवाद नाहीत. कंपनीने या तिमाहीसाठी विक्रीत ३५ टक्के वाढ साधली असून, उत्पन्न ८८५ कोटी रुपयांवर नेले आहे, तर नक्त नफ्यात ६९ टक्के वाढ होऊन तो १५८ कोटी रुपयांवर गेला आहे. सद्य:परिस्थितीत केवळ निवडक कंपन्यांवर लक्ष ठेवायला हवे. एफएमसीजी, फार्मा आणि माहिती-तंत्रज्ञान सारखी क्षेत्रे गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात. १३.५७ कोटी भागभांडवल असलेली तानला प्लॅटफॉर्म मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी फायद्याची खरेदी ठरू शकते. तीन वर्षांपूर्वी केवळ ३६ रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर आज १,४०० रुपयांवर गेल्यामुळे कदाचित महाग वाटू शकेल. मात्र कंपनीचे विस्तारणारे सेवा क्षेत्र पाहता ही एक योग्य खरेदी ठरू शकेल. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचे धोरण अवलंबावे.

तानला प्लॅटफॉम्र्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२७९०)

शुक्रवारचा बंद भाव :          रु. १,५०८/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :     रु. २,०९४ / ७३०

बाजार भांडवल :             रु. २०,४७६ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. १३.५७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न           (%)

प्रवर्तक                    ४३.७४  

परदेशी गुंतवणूकदार           १३.४७    

बँक/ म्यु. फंड/ सरकार         ०.०५    

इतर/ जनता                 ४२.७४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :      लार्ज कॅप

* प्रवर्तक         :          डॉ. उदय कुमार रेड्डी

* व्यवसाय क्षेत्र :            दूरसंचार/ आयटी

* पुस्तकी मूल्य :            रु. ७६.८

* दर्शनी मूल्य         :      रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश :         २००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु.३६.९

*  पी/ई गुणोत्तर :      ४०.८

*  समग्र पी/ई गुणोत्तर : ३१

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०४

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ५५२

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :       ५२

*  बीटा :      ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.