बाजाराचा तंत्र-कल  : असावं की नसावं? 

येणाऱ्या दिवसांत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० या स्तरावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे.

आशीष ठाकूर ashishthakur1966 @gmail.com
गेल्या पंधरा दिवसापासून निफ्टी निर्देशांक १६,०००चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरत आहे. टू बी ऑर नॉट टू बी.. ही विवंचना. पण यातील आशादायक ‘टू बी’ म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक असलेल्या ‘ब’ वर्गातील समभागांनी तेजीची कमान आपल्याकडे घेत, निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद १५,९००च्या आसपास होत आहे.  या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५३,१४०.०६

निफ्टी : १५,९२३.४०

येणाऱ्या दिवसांत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० या स्तरावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. हा स्तर राखण्यास निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५३,००० ते ५४,००० आणि निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १६,००० ते १६,३०० असे असेल.

आता नाण्याची दुसरी बाजू विचार करता, सेन्सेक्सला ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकाला १५,७००चा स्तर राखण्यास अपयश आल्यास ही क्षणिक विश्रांती दीर्घ मुदतीच्या विश्रांतीत रूपांतरित होऊन निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५१,३०० ते ५०,१५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,४०० ते १५,१०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) एसीसी लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १९ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – २,१२९.१५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,०५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,०५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,०५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,९५० रुपयांपर्यंत घसरण.

२) मास्टेक लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १९ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – २,४७९.२५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,३०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,१५० रुपयांपर्यंत घसरण.

३) इंडियन एनर्जी एक्स्चेंज लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २२ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – ४१२.९५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४,०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

४) अंबुजा सिमेंट

* तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २३ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – ३८३.०५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३३० रुपयांपर्यंत घसरण.

५) आयसीआयसीआय बँक लिमिटेड      

* तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २४ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – ६६० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाद्वारे ६५०चा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७०० रु., द्वितीय लक्ष्य ७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६०० रुपयांपर्यंत घसरण.

६) अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – सोमवार,२६ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – ७७१ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ८५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६८० रुपयांपर्यंत घसरण.

७) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २६ जुलै

* १६ जुलैचा बंद भाव – १,६१९.१० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,५८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,५८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Technical analysis of stocks market nifty weekly update weekly nifty report zws

ताज्या बातम्या