27th May 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: २७ मे २०२४ ला वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आज शुभ योगांचा मेळा जमणार आहे. सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ५३ मिनिटांपसऱ्यांत चतुर्थी कायम असेल व त्यानंतर पंचमी तिथी सुरु होईल. सोमवारी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांपासयंत पूर्व आषाढ नक्षत्र जागृत असणार आहे. तर सोमवारचा संपूर्ण दिवस ते मंगळवारी २८ मे च्या सकाळी ४ वाजेपर्यंत शुक्ल योग असणार आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असणार हे पाहूया..

२७ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.

26th May Ekadant Sankashti Chaturthi 55 Minutes Abhjiaat Muhurta Mesh To Meen Rashi Bhavishya
एकदंत चतुर्थी, २६ मे पंचांग: संकष्टीला दुपारी ५५ मिनिटांचा अभिजात मुहूर्त; मेष ते मीनपैकी कुणाचा दिवस असेल मोदकासारखा गोड?
23 May Marathi Panchang Budhha Purnima Shani Nakshtra
२३ मे पंचांग: जोडीदाराचं प्रेम, अपार बुद्धी; बुद्ध पौर्णिमेला शनीचं नक्षत्र जागृत होताच १२ राशींच्या कुंडलीत उलथापालथ, पाहा भविष्य
28th May Marathi Panchang Tuesday Bramha Yog
२८ मे पंचांग: मंगळवारी पूर्ण दिवस ब्रम्ह योग बनल्याने १२ पैकी कोणत्या राशींना धनलाभासह, प्रगतीचे योग; वाचा १२ राशींचे भविष्य
24th May Panchang & Marathi Horoscope
२४ मे पंचांग: अचानक धनलाभ व साहसी निर्णय, मेष ते मीन राशीत शिव व सिद्ध योगामुळे आज मोठे बदल; वाचा शुक्रवारचं भविष्य
29th May Panchang & Marathi Horoscope
२९ मे पंचांग: श्रावण नक्षत्रात मेष ते मीन राशींवर बरसणार सुखाच्या सरी; इंद्र योगासह तुमच्या राशीत कोणते बदल आज घडणार, पाहा
21st May Panchang & Marathi Horoscope
२१ मे पंचांग: नृसिंह जयंतीला स्वाती नक्षत्रात उजळून निघेल तुमचंही नशीब? १२ राशींना मंगळवारी बाप्पा कसा देणार प्रसाद?
8th June Panchang & Rashi Bhavishya
८ जून पंचांग: शनिवारी बरसणार आनंद सरी; तुमच्या राशीच्या कुंडलीत शनी महाराज काय बदल घडवणार पाहा, १२ राशींचे भविष्य
Chaturgrahi Yog 2024
उद्यापासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १०० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच लक्ष्मी येईल दारी!

वृषभ:-सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

मिथुन:-सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

कर्क:-सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. सहकार्‍यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. जुगारात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

सिंह:-दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. जीवावर उदार होऊ नका. विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

कन्या:-भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्‍यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.

तूळ:-काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.

वृश्चिक:-अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.

धनू:-मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.

मकर:-प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.

कुंभ:-बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

हे ही वाचा<< ५ महिने शनि असणार वक्री; ‘या’ दोन राशींवर असणार लक्ष्मीची कृपा अन् ‘या’ दोन राशींना आर्थिक समस्या उद्भवणार

मीन:-पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर