• मेष:-
    दिवस आनंदात घालवाल. काही गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. भागीदारीत समाधानी असाल. अचानक धनलाभ संभवतो. मनातून गैरसमज काढून टाकावा.
  • वृषभ:-
    भावंडाना दूर गावी जावे लागेल. मानसिक चंचलता जाणवेल. सामाजिक बांधिलकी जपाल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक सौख्याला बहर येईल.
  • मिथुन:-
    घरात मंगलकार्ये होतील. उगाचच वादात अडकू नका. नसत्या चिंता करू नका. कचेरीच्या कामात अधिक वेळ जाईल. मैदानी खेळ खेळाल.
  • कर्क:-
    कामाची धावपळ राहील. उत्तम व्यावसायिक वातावरण राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतो. कलेला प्रोत्साहन मिळेल.
  • सिंह:-
    हातातील कामाला यश येईल. बौद्धिक छंद जोपासाल. लहरीपणे वागाल. वरिष्ठांना खुश कराल. कोणाशीही वैर पत्करू नये.
  • कन्या:-
    घरगुती जबाबदारी वाढेल. खर्चावर आवर घालावी लागेल. मनाजोगे सौख्य लाभेल. जमिनीच्या कामातून फायदा संभवतो. पत्नीची प्राप्ती वाढेल.
  • तूळ:-
    कामाचा ताण वाढेल. शारीरिक कष्ट वाढू शकतात. जोमाने कामे हाती घ्याल. अडचणीतून मार्ग काढाल. किरकोळ दुखापती होऊ शकतात.
  • वृश्चिक:-
    चैनीच्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक सौख्यात भर टाकाल. इतरांचा विश्वास संपादन करावा. घरात धार्मिक कार्य काढाल. प्रत्येक कामात आनंद शोधाल.
  • धनु:-
    काही गोष्टींची गुप्तता पाळाल. काही गोष्टी क्षणिक जाणवतील. दिवस चैनीत घालवाल. कमिशनचा फायदा उठवाल. मोठ्या लोकांच्यात वावराल.
  • मकर:-
    कामात चिकाटी सोडू नका. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. आर्थिक चिंता मिटेल. अडचणींवर मात करावी.
  • कुंभ:-
    उत्तम व्यावसायिक वातावरणात राहील. तुमच्यातील कलेला चांगला वाव मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्यातील चांगले गुण दिसून येतील. वरिष्ठांची मर्जी राखावी.
  • मीन:-
    मनाची विशालता दाखवाल. भावंडांची प्रगती होईल. घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. मनातून गैरसमज दूर करावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर