1. मेष:-
    अचानक येणार्‍या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.
  2. वृषभ:-
    दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
  3. मिथुन:-
    उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
  4. कर्क:-
    चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.
  5. सिंह:-
    बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अतिविचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.
  6. कन्या:-
    जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.
  7. तूळ:-
    दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.
  8. वृश्चिक:-
    सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्‍यांनी भडक शब्द वापरू नयेत. एखादी घटना द्विधावस्था वाढवेल.
  9. धनू:-
    बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
  10. मकर:-
    ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खूश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.
  11. कुंभ:-
    दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.
  12. मीन:-
    शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर