scorecardresearch

Premium

आजचे राशीभविष्य, रविवार, ०१ ऑक्टोबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ गणेश्वराय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यवसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

वृषभ

ॐ शंकराय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ महादेवाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतिची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यवसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

ॐ विठ्‌ठलाय नमः हा मंत्र आज म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा

कन्या

ॐ प्रभंजनाय नमः या मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – निळा

तुळ

ॐ तेजस्विनैय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

ॐ चिद्‌रत्नाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पिवळा

धनु

ॐ चिद्‌प्रशांताय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यवसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ विघ्ननाशकाय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

ॐ सुदनवाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग- नारंगी

मीन

ॐ त्रिलोकेशाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – गडद लाल

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2017 at 01:33 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×