• मेष:-
    लहान प्रवास कराल. मानसिक दोलायमानता जाणवेल. आपला ठामपणा टिकवून ठेवा. गैरसमजाला मनातून दूर सारा. इच्छा जागृत ठेवावी.
  • वृषभ:-
    आवडीच्याबाबत कसूर करू नका. चित्त एकाग्र ठेवावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांच्या मताचा आदर करावा. प्रक्रृतीची काळजी घ्यावी.
  • मिथुन:-
    मनाची चंचलता जाणवेल. पोटाची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार जाणवतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
  • कर्क:-
    शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. नवीन संधीची वाट पाहावी. अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांकडून विरोध होऊ शकतो. हातातील कामात यश येईल.
  • सिंह:-
    उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. कौतुकास पात्र व्हाल. वाहन विषयक प्रश्न सुटतील. एखादे नवीन वाहन खरेदीचा विचार करावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा.
  • कन्या:-
    उत्तम गृहसौख्य लाभेल. कामातून चांगली प्राप्ती होईल. नवीन मित्र जोडता येतील. अपेक्षांना आवर घालावी. अधिकाराची जाणीव ठेवा.
  • तूळ:-
    शब्द जपून वापरावेत. खर्चाचा मेळ घालावा लागेल. कोणाविषयी मनात द्वेष बाळगू नका. वादाचे मुद्दे बाजूला सारा. फसवणुकीपासून सावध राहावे.
  • वृश्चिक:-
    किरकोळ जखमांकडे लक्ष द्या. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पेलाल. कष्टाशिवाय पर्याय नाही. समाधानकारक आर्थिक लाभ होईल.
  • धनु:-
    कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढावा. फार काळजी करत बसू नका. प्रवासात काळजी घ्यावी. घरात काही बदल करून पहावेत. खर्चाचा ताळमेळ घालावा.
  • मकर:-
    प्रवासात खर्च वाढेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. खंबीरपणे विचार करावा. कागदपत्रे जपून ठेवावीत.
  • कुंभ:-
    दिवस प्रसन्नतेचा राहील. सर्वांशी आनंदाने वागाल. नवीन मित्र जोडावेत. प्रयत्नात कसूर करू नका. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना फायदा होईल.
  • मीन:-
    घरातील थोरांचा विरोध लक्षात घ्यावा. प्रवास जपून करावा. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्य वाढेल. कमिशनमधून लाभ होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर