मेष

आज दिवसभर अथर्वशीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्जप्रकरणाचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – निळा

वृषभ

महादेवाचे स्मरण करून ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये उत्तम कामगिरी उत्तम राहिल.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्तोत्राचा पाठ करावा. आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – निळा

कर्क

कुलस्वामिनीचे दर्शन घेवून दिवसाची सुरुवात करावी. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

ओम श्री क्लीम नमः जप करणे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळीनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करीत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी
आजचा रंग – निळा

कन्या

महादेवाच्या मंदिरात एक मूठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरुवात करणे. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – नारंगी

तूळ

कुलस्वामिनीचे दर्शन घेणे, ओटी भरणे. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजतील. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग –  पांढरा

वृश्चिक

आज गणेश स्तुती म्हणणे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार. नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – क्रीम

धनु

गणपती मंदिरात गुलाबाचे फूल अर्पण करावे. प्रवास जपून करावा. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – आकाशी

मकर

ग्रामदैवताचे दर्शन घ्यावे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

मीन

गणपती अर्थवशीर्षाचे पठण करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. दूरच्या प्रवासाचे योग.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu