29th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २९ एप्रिलला आज चैत्र मासातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. सोमवारी पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असेल, व आजच्या दिवशी सिद्ध व रवी योग जुळून येणार आहे. आजच्या दिवशी सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपासून ते ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहू काळ असेल त्यानंतरचा संपूर्ण दिवस हा शुभ असेल. आपल्या राशिनुरूप उद्याचा दिवस तुम्हाला कसा जाईल हे जाणून घेऊया..

२९ एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.

Shukraditya Rajyoga
१२ महिन्यांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सूर्य-शुक्रदेवाच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा
14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
11th June Daily Rashi Bhavishya Marathi Horoscope
११ जून दैनिक राशी भविष्य: मेष, वृश्चिकसह आज पंचांगानुसार ‘या’ मंडळींच्या कुंडलीत प्रचंड लाभ; १२ राशींना कसा जाईल मंगळवार?
3 June Panchang & Marathi Horoscope
३ जून पंचांग: आश्विनी नक्षत्रात सुरु होणार आठवडा, झटपट कामे व खर्चाचा ताळमेळ, मेष ते मीन राशींचा सोमवार कसा जाईल?
June Monthly Marathi Horoscope
शनी जूनचे ३० दिवस करणार १२ राशींवर राज्य; मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे भविष्य वाचा, तुमच्या नशिबात धन आहे की कष्ट?
three zodic signs will shine with Nakshatra transformation
सूर्य देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य
25th May Panchang Marathi Rashi Bhavishya Mesh To Meen Daily Horoscope
२५ मे पंचांग, शनिवार: ज्येष्ठा नक्षत्र व सिद्ध- साध्य योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? १२ राशींचे भविष्य वाचा
24th May Panchang & Marathi Horoscope
२४ मे पंचांग: अचानक धनलाभ व साहसी निर्णय, मेष ते मीन राशीत शिव व सिद्ध योगामुळे आज मोठे बदल; वाचा शुक्रवारचं भविष्य

वृषभ:-जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.

मिथुन:-उगाच चीड चीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

कर्क:-जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.

सिंह:-प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.

कन्या:-बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.

तूळ:-चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तु खरेदी कराल.

वृश्चिक:-आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.

धनू:-मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.

मकर:-आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्या कडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.

कुंभ:-उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन:-चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर