Dussehra & Vijayadashami 2022: यंदा देशभरात सर्वच सणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. येत्या महिन्यात ५ ऑक्टोबरला दसरा सण साजरा होईल तत्पूर्वी सर्वत्र नवरात्रीची धामधूम पाहायला मिळत आहे. दसरा व विजयादशमी हे सण एकाच अर्थाने पाहिले जातात मात्र हिंदू पुराणानुसार यात मोठा फरक आहे. या दोन्ही सणांचा दिवस जरी एक असला तरी सण साजरा करण्यामागे औचित्य वेगवेगळं आहे. दसरा व विजयादशमीमध्ये नेमका फरक काय व त्यामागील कथा सविस्तर जाणून घेऊयात…

दसरा का साजरा केला जातो?

दसरा हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. सर्वात शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून वाईटावर विजय मिळवला होता. असं म्हणतात दसऱ्याच्या आधीचे नऊ दिवस श्रीरामांनी देखील आदिशक्तीचे पूजन केले होते, त्यांनतर दहाव्या दिवशी त्यांनी रावणाशी युद्ध करून रस्त्यावर विजय मिळवला.

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!

Navratri 2022: नवरात्रीच्या ९ दिवसासाठी देवीच्या ९ नावांचे खास मंत्र; यंदा ‘या’ रूपात अवतरणार आदिशक्ती

विजयादशमी का साजरी होते?

विजयादशमी व दसरा हा सण एकच मानला जात असला तरी विजयादशमीच्या मागील पौराणिक कथा वेगळी आहे. दुर्गा देवीने महाभयंकर महिषासुर राक्षसाला नऊ दिवसांच्या लढाईनंतर दहाव्या दिवशी ठार केले होते. या विजयाला साजरा करणारा दिवस म्हणजे विजयादशमी. महिषासुराच्या सेनेने जेव्हा देवतांना त्रास देत उच्छाद मांडला होता तेव्हा देवी दुर्गेने महाकाली रूपात महिषासुराला लढा देत त्याचा शिरच्छेद केला होता.

Navaratri 2022: यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावर होणार? वर्षभरासाठी शुभ-अशुभ संकेत देते ‘ही’ गोष्ट

सरस्वती पूजन की शस्त्रपूजा

दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने शक्तीचे पूजन केले जाते. श्रीराम व माता दुर्गा यांच्या रूपात अन्यायावर न्यायाने मिळवलेला विजय साजरा केला जातो. यादिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळी राजे महाराजे दशमीच्या दिनी आपल्या सैन्याच्या शस्त्रांची पूजा करत. हीच परंपरा आजही कायम आहे. यामुळे मान व प्रतिष्ठा कायम राहते अशी मान्यता आहे. युद्धाच्या मार्गाला न अवलंबता बुद्धीच्या बळावरही विजय मिळवता येतो त्यामुळे विद्येला शस्त्र मानून दसऱ्याच्या निमित्त सरस्वती पूजनालाही विशेष मान आहे.

(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)