Baby Boy Name on Hanuman : आज हनुमान जयंती. संपूर्ण देशात हनुमान जयंती ही हनुमानाचा जन्मदिवस म्हणून उत्साहात साजरी केली जाते. एक मुखी, पंचमुखी, एकादशमुखी, बाल हनुमान, भक्त हनुमान,
वीर हनुमान, हनुमान योगी असे हनुमानाचे अनेक रुप प्रसिद्ध आहे. जसे हनुमानाचे प्रत्येक रुप लोकप्रिय आहे तसेच विविध नावे सुद्धा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. जर तु्मच्या घरी नुकताच मुलगा झाला असेल तर तुम्ही हनुमानाच्या नावावरून तुमच्या मुलाचे नावे ठेवू शकता.
हिंदू धर्मात नामकरणला विशेष महत्त्व आहे. बाळाच्या कुंडलीनुसार नवजात बाळाचे नामकरण केले जाते. बाळाचे नाव खूप महत्त्वपूर्ण असते त्यामुळे पालक खूप विचार करून बाळाचे नाव ठेवतात. आज आपण एकापेक्षा एक सुंदर आणि अर्थपूर्ण हनुमानाच्या नावांची लिस्ट जाणून घेणार आहोत.

रुद्रांश

हनुमानाला शिवचा अंश मानले जाते. हनुमान शिवचा ११ वा रुद्रअवतार आहे. रुद्रांश म्हणजे शिवचा अंश. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव रुद्रांक्ष ठेवू शकता.

शौर्य

हनुमान पराक्रमी आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. या दोन्ही नावाचा संयुक्त अर्थ शौर्य होतो. याच कारणामुळे हनुमानाला शौर्य सुद्धा म्हटले जाते. तुम्ही तुमच्या मुलाचे हे सुंदर नाव ठेवू शकता.

अतुलित

हनुमानाच्या या नावाचे वर्णन हनुमान चालीसेत केले आहे. अतुलित शब्दाचा अर्थ होतो की कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता.

हेही वाचा : Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?

मनोजव्य

हनुमान वायु देवतेचे पुत्र होते त्यांना मनोजव्य सुद्धा म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ होतो हवेप्रमाणे तेज असणे. हे नाव तुमच्या बाळासाठी योग्य असू शकते.

अभ्यंत

अभ्यंत हा शौर्य या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे भीतीमुक्त असणे. धाडसी आणि निर्भयी असणारी व्यक्ती म्हणजे अभ्यंत होय. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या बाळाचे ठेवू शकता.

अंजनेय

तुम्ही तुमच्या बाळाचे नाव अंजनेय ठेवू शकता. माता अंजनीचा पुत्र म्हणून हनुमानाला अंजनेय संबोधले जाते.

कपीश

माकड हे हनुमानाचे एक रुप आहे. माकडाचे देव, नेतृत्व, सुरक्षा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिक म्हणून कपीश संबोधले जाते. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव सुद्धा ठेवू शकता.

तेजस

तेजस हे हनुमानाचे एक नाव आहे. तेजसचा अर्थ होतोय उज्वल आणि तेजोमय. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता.

चिरंजीवी

तुम्ही तुमच्या बाळाचे नाव चिंरजीवी ठेवू शकता. हनुमान अमर आहेत. चिंरजीवचा अर्थ होतो की जो अमर आहे आणि त्याला कोणी मारू शकत नाही.

आभान

आभान हे सुद्धा खूप सुंदर नाव आहे. आभान या शब्दाचा अर्थ होतो सूर्यासारखा चमकणारा. हनुमानाच्या या नावावरून तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ठेवू शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)