Today Rashi Bhavishya, 13 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
Mother in Law Zodiac
Astrology: राशीनुसार जाणून घ्या कसा असेल तुमच्या सासूचा स्वभाव? लग्नानंतर होणार नाही भांडण
28th April Panchang Daily Marathi Horoscope
२८ एप्रिल पंचांग: प्रेमाला संमती ते आर्थिक प्रगती, मेष ते मीन राशीचा रविवार कसा जाईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?
16th April Panchang rashi bhavishya these zodiac signs Wishes will be fulfilled Aries to Min signs Daily marathi horoscope
१६ एप्रिल पंचांग: इच्छा होतील पूर्ण, हातात येतील नवीन अधिकार; वाचा मेष ते मीन राशींचा कसा असेल मंगळवार ?

वृषभ:-

तब्येतीची तक्रार कमी होईल. अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.

मिथुन:-

नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल.  आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कर्क:-

व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल. आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल.

सिंह:-

कामाचा व्याप वाढता राहील. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.

कन्या:-

जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

तूळ:-

आपल्याच मर्जीत दिवस घालवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील. स्व‍च्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल.  मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

वृश्चिक:-

काही कामे अडकून राहू शकतात. कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा. लपवाछपवीचा मार्ग धरू नका.  अपेक्षित उत्तराने खुश व्हाल.

धनू:-

घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तु खरेदी करता येतील.

मकर:-

जोडीदाराच्या मताचा आदर करावा. समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात.

कुंभ:-

दिवस आपल्या मनाजोगा घालवाल. कामातील प्रयत्न फळाला येतील. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.

मीन:-

उतावीळपणा करून चालणार नाही. फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर