Chaturgrahi Yoga 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह अनेकदा राशिबदल करताना त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतात; ज्याचा शुभ-अशुभ परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. त्यात गुरू ग्रहाने नुकताच वृषभ राशीत प्रवेश केलाय. यानंतर सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मे महिन्याच्या शेवटी ग्रहांचा राजकुमार बुधदेखील वृषभ राशीत प्रवेश करील. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. त्याशिवाय गुरू आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोगही तयार होतोय. इतकेच नाही, तर सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे होणारा बुधादित्य राजयोग आणि शुक्र व सूर्य यांच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे. या योग आणि राजयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी अचानक धनलाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तर त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ

चतुर्ग्रही योग वृषभ राशीधारकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तसेच तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला पैसा, व्यवसाय, मालमत्ता व कौटुंबिक बाबींमध्ये चांगले यश मिळू शकते. तसेच तुमची आर्थिक स्थितीदेखील या काळात सुधारण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे.

Weekly Horoscope in Marathi
Weekly horoscope: ६ मेपासून सुरु होणार राशींचा सुवर्णकाळ! मिळेल बक्कळ पैसा, कसा जाईल तुमचा आठवडा?
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
6th May Panchang & Rashi Bhavishya
६ मे पंचांग: गुरुकृपेचा लाभ, गोडवा व इच्छापूर्ती; शिवरात्रीला आज कुणाचे नशीब चमकणार, महादेव देतील वरदान
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Mangal gochar in aries 2024
मंगळ देणार दुप्पट पैसा! ‘या’ तीन राशी मिळवणार धन-संपत्ती अन् अपार यश
7th May Panchang Amavasya Mesh To Meen Horoscope
७ मे पंचांग: मिथुन व कन्या राशीला लाभ; वृषभ राशीचे आयुष्य ‘असं’ बदलणार, अमावास्येला तुमच्या राशीच्या नशिबात काय?
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
Surya Gochar 2024
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? सूर्यदेवाच्या कृपेने नव्या नोकरीसह तुम्हाला कधी मिळणार प्रचंड धनलाभ?

वर्षानंतर बुधाचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ राशीधारकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण? धन-संपत्तीत भरभराटीची शक्यता

कन्या

गुरू, शुक्र, बुध व सूर्य यांचा एकत्र योग तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. तसेच, या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. अशा स्थितीत चारही शुभ ग्रह मिळून शिक्षणाच्या बाबतीत यश मिळवून देतील. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते. त्याच वेळी जे स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी आहेत, त्यांना यावेळी परीक्षेत यश मिळू शकते. या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर

चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात नोकरदार लोकांना पदोन्नतीसह चांगल्या पगारवाढीचा आनंद मिळू शकतो. तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत, त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. तिथे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अनेक चांगल्या ऑफर्स तुमच्यासाठी येऊ शकतात. तसेच यावेळी बेरोजगारांनाही नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.