scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार ४ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्ती दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवतील. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील.

Astro new
आजचे राशीभविष्य १९ डिसेंंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 4 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
March month Astrology
March Astrology : मार्च महिन्यात ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल, कुटूंबात नांदेल सुख समृद्धी
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”

खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

लहान प्रवास घडू शकेल. हातातील कलेतून आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल. जवळचे मित्र बर्‍याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनात काहीशी चलबिचलता राहील. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल. बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो.

तूळ (Libra Horoscope Today ):-

जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. घरातील कामात अधिक वेळ जाईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आध्यात्मिक आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. मित्रांच्या ओळखीने काम होईल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

अचानक धनलाभ होण्याची शक्यता. शेअर्स, जुगार यातून अपेक्षित लाभ मिळू शकेल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळवाल. कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत. कोणतेही साहस करतांना सावध राहावे. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. अति भावनाशील होऊ नका. जुगारातून अपेक्षित कमाई कराल. दिवस मनासारखा घालवाल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 4 september 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 04-09-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×