Shukra And Rahu Yuti: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि ग्रहांची युती यास फार महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा ग्रहांची युती होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३१ मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. जिथे राहू ग्रहाची उपस्थिती आधीपासूनच आहे. यावेळी मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग होईल. ही स्थिती २३ एप्रिलपर्यंत अशीच राहणार आहे. अशा स्थितीत राहू आणि शुक्राची युती काही राशींसाठी लाभदायक ठरु शकते. या संयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार, जाणून घेऊया…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

राहू आणि शुक्राची जोडी वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला परदेशातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक संधींचे दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : १५ मार्चपासून ‘या’ राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा? मंगळ गोचर करताच शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत)

मिथुन राशी

राहू आणि शुक्राची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. अविवाहित लोकांसाठी देखील हा चांगला काळ ठरु शकतो. या काळात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

राहू आणि शुक्राचा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणारा ठरु शकतो.  तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)