Rahu-Shukra Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर म्हणजेच मार्गक्रमण करत राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. प्रत्येक ग्रहाचा राशी परिवर्तनासाठी लागणारा कालावधी जरी वेगवेगळा असला तरी मार्गी होत, वक्री होत किंवा काही अंशात दिशा बदलून ग्रहांची हालचाल होत असते. येत्या काही दिवसात दोन अशाच ग्रहांची तब्बल १२ वर्षांनी महायुती होणार आहे. या महत्त्वाच्या ग्रहांच्या मिलनामुळे सर्वच राशींवर सकारात्मक, नकारात्मक परिणाम होणार आहेत पण त्यातही काही अशा प्रशी आहेत ज्यांना सर्वाधिक लाभ होऊ शकतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १२ वर्षांनी मार्च महिन्यात दोन ग्रहांची युती तीन राशींचे ‘अच्छे दिन’ सुरु करणार आहे. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहेत तर शुक्र ग्रह मार्च महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे, या महायुतीमुळे नक्की कोणत्या राशीच्या मंडळींना फायदा होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार राहू व शुक्राची युती वृषभ राशीवर शुभ प्रभाव दर्शवू शकते. या कालावधीत आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहू- शुक्राची युती आपल्या धन भावी तयार होत आहे त्यामुळे धनलाभाचे योग आहेत. आर्थिक कक्षा रुंदावू शकतात व नवनवीन स्रोतातून पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. आपल्याला मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते मात्र आपल्याला वाणीवर व विचारांवर खूप नियंत्रण ठेवावे लागू शकते. गुंतवणुकीचा विचार करत असल्यास या कालावधीत फायदा होऊ शकतो. या कालावधीत बचतीत सुद्धा वाढ होऊ शकते.

मिथुन रास

राहू शुक्र युती मिथुन राशीच्या कर्म भावी तयार होत आहे. या युतीमुळे मिथुन राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रचंड मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत. आपण स्वतःचा व्यवसाय करत असल्यास या कालावधीत फायद्यात राहाल. स्वतःसाठी काम करण्याचे सुख प्राप्त होऊ शकते. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. अचानक धनलाभ झाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील. घरात एखादे महत्त्वाचे धार्मिक कार्य योजले जाऊ शकते.

हे ही वाचा<< ९० अंशात गुरुदेवाचे युवा अवस्थेत भ्रमण, धनलाभासह ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी, होईल भाग्योदय

धनु रास

ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी शुक्र व राहूची युती सक्रिय असणार आहे. यामुळे आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ सगकते. या कालावधीत आपल्या कुटुंबात सुख शांती कायम राहू शकते. आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत. प्रॉपर्टीच्या डीलिंग संदर्भातील कामे मार्गी लागू शकतात. या कालावधीत आपलायला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल तसेच अनपेक्षित मैत्रीतून लाभ होऊ शकतो. कामात यश मिळण्यासाठी काही प्रमाणात डोकं शांत ठेवणे खूप गरजेचे ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu shukra yuti after 12 years golden pot of money can be brought by lakshmi for these rashi astrology today in marathi svs
First published on: 26-01-2024 at 18:44 IST