Shani Dev Copper Rashi Bhavishya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव ग्रहांमधून गोचर संथ गतीने करत असले तरी नक्षत्र परिवर्तन मात्र वेळोवेळी करत असतात. शनीच्या नक्षत्र परिवर्तनानुसार त्याचा प्रभाव सुद्धा बदलत असतो. शनी महाराजांनी १२ मेला पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनासह काही राशींवर शनीच्या तांब्र चरणाचा प्रभाव सुद्धा असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीची चार प्रकारची पाऊले असतात, सुवर्ण, चांदी, तांब्र, लोखंड. यापैकी तांब्याच्या पायाचा प्रभाव हा अत्यंत शुभ मानला जातो. शनीदेव पुढील काही काळ तीन राशींच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करणार आहेत. ज्याने या राशींचे नशीब चमकणार आहे. धनदौलतीत वाढ होऊ शकते. पुढील नक्षत्र गोचर होईपर्यंत शनी देव या नशीबवान राशींना भरभरून यश व धनलाभ देणार आहेत. या लकी राशी कोणत्या चला पाहूया..

शनी देव या नशीबवान राशींना भरभरून यश व धनलाभ देणार

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनी देव तांब्याच्या पावलाने भ्रमण करताना वृषभ राशीला लाभ देणार आहेत. या कालावधीत आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळते. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या पथावर काही पाऊले पुढे जाऊ शकाल. मागील काही कालावधीपासून जी कामे अडकून पडली होती ती पूर्ण होऊ शकतील. व्यापारी वर्गाला विशेष धनलाभ होऊ शकेल. व्यवसायानिमित्त बाहेर गावाची फेरी होईल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. वडिलांची साथ लाभेल.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

शनी देव तांब्याच्या पावलाने चालताना कन्या राशीला फायदे अनुभवता येणार आहे. कोर्टाच्या खटल्यांमध्ये यश प्राप्त होऊ शकते. आपल्या शत्रूंवर मात करण्याची संधी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. कामाच्या बाबत इच्छापूर्ती होऊ शकते. संतती सुख लाभू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. दैनिक आर्थिक मिळकत वाढू शकते.

हे ही वाचा<< चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनी देवाचे तांब्र पावलाने चालणे कुंभ राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. आपला मान- सन्मान वाढीस लागू शकतो. नशिबाचे तारा चमकू शकतो व वेळोवेळी नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. नोकरदार मंडळींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. तुम्ही ज्या कामासाठी मागील काही वर्षे काम करताय ती कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक आयुष्य सुखकर होऊ शकते. लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. व्यापाऱ्यांना पुढील काही महिने फायदा होऊ शकतो. तुमच्या माध्यमातून जोडीदाराची आर्थिक प्रगती होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)