Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रात शनिला महत्त्वाचं स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. सध्याच्या काळात शनी कुंभ राशीत मूळ त्रिकोण राशीत आहे आणि २०२५ पर्यंत राहणार आहे. शनिदेवाने नुकतेच पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात गोचर केलं आहे आणि येत्या १८ आॅगस्टला शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदात गोचर करणार आहेत. अशा शनिदेवाच्या स्थितीमुळे काही राशींना ८८ दिवस मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया नशीबवान राशी कोणत्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?

मिथुन राशी

शनिदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस येऊ शकतात. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे. 

(हे ही वाचा : २ जूनपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत, बदलतील दिवस? बुधदेव अस्त स्थितीत येऊन करु शकतात धनवर्षा, दारी येईल लक्ष्मी!)

कन्या राशी

शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले दिवस येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी या लोकांचं कौतुक होऊ शकतो. त्यामुळे पगारवाढ आणि प्रमोशनची संधी चालून येऊ शकते. रखडलेली कामं आता मार्गी लागण्यास सुरुवात होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला सापडू शकतात. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारु शकते. परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे.  वैवाहिक जीवनातही प्रेम आणि सौभाग्य लाभू शकतो. शिवाय समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

वृश्चिक राशी

शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये दुप्पट फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग जुळून येऊ शकतात. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev blessings 88 days these signs will be blessed by shani dev saturn will give a lot of money pdb