Saturn Planet Gochar In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहांमधील सर्वात संथ गतीने प्रवास करणारा ग्रह आहेत. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागतो. आपल्या माहितीसाठी कर्मदाता शनीने २०२३ च्या जानेवारी महिन्यात तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेतला होता. २०२५ पर्यंत शनी महाराज कुंभेतच स्थित असतील व नंतर मीन राशीत प्रवेश घेतील. शनी कुंभेत असेपर्यंत म्हणजे पुढील ६ महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात. या राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते. धन- दौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते. अशा या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना २०२५ पर्यंत नेमका कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया..

२०२५ पर्यंत शनी महाराज ‘या’ राशींचे ठरतील धनी

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीच्या मंडळींसाठी शनी देवाचे भ्रमण हे लाभदायक असणार आहे. आपल्या राशीचे स्वामीच शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीत आपसूकच गोष्टी मनाप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल. शनीने आपल्या राशीत लग्न स्थानी शश राजयोग साकारला आहे. आपल्याला या कालावधीत हा राजयोगच समाजात मान- सन्मान मिळवून देऊ शकतो. या कालावधीत आपल्याला आर्थिक प्रगती साधता येईल. पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहात. शनी तुम्हाला या कर्माची फळं नक्कीच देऊ करतील. विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडीगुलाबीचा असणार आहे तर अविवाहित मंडळी नात्यात काही पाऊले पुढे जाऊ शकतात.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

शनी देवाचे कुंभ राशीती; भ्रमण हे मकर राशीचं मंडळींसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. शनीदेव आपल्या राशीच्या धनभावी भ्रमण करत आहेत. तसेच आपल्या राशीचे स्वामी सुद्धा आहेत. आपल्याला पुढील सहा महिन्यांमध्ये वेळोवेळो आकस्मिक धनलाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीचे एकाहून अधिक स्रोत लाभतील. नशिबाची साथ लाभेल. या कालावधीत आपल्याला अडकून पडलेले धन परत मिळू शकते. या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अपेक्षित यश लाभू शकते. आपल्या वाणीचा प्रभाव महत्त्वाचा असेल त्यामुळे अनेकांवर प्रभाव टाकू शकता पण आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते.

हे ही वाचा<< २७ मे पंचांग: कमाईत वाढ, गोडीगुलाबीचं जीवन, मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा जाईल? वाचा आजचं भविष्य

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

२०२३ मध्ये शनीच्या गोचरणानंतर मिथुन राशीची साडेसाती संपुष्टात आली होती. त्यामुळे साधारण मागील दीड वर्षांपासून सुद्धा शनीच्या कृपेने मिथुन राशीचे अच्छे दिन चालू आहेत. शनी आपल्या राशीच्या भाग्य स्थानी भ्रमण करत आहेत त्यामुळे पुढील कालावधीत सुद्धा आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते. जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत अस्सल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची साथलाभेल . आपल्याला धार्मिक व मंगलकार्यांमध्ये सहभाग घेता येई. या कालावधीत आपल्याला परदेशात यात्रेचा योग आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)