Venus And Sun Conjunction In Leo : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सूर्य आणि शुक्राची युती सिंह राशीमध्ये होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य यांच्यात शत्रुत्वाची भावना असते. त्यामुळे या युतीचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात थोडी काळजी घ्यायला हवी. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी…

कर्क : शुक्र आणि सूर्याची युती तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या दुसऱ्या घरात तयार होत आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात धन आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. तसेच यावेळी तुम्ही कोणतेही पैसे उधार देऊ नका. अन्यथा ते बुडू शकतात. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वाद टाळावेत. खर्च वाढल्याने तणाव राहील. तसंच बजेटमध्ये गडबड होऊ शकते. मेहनतीचे फळ कमी मिळेल. दीर्घकालीन बचत खर्च करता येईल.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

आणखी वाचा : Chanakya Niti: या ४ गोष्टी केल्यास सर्वजण तुमच्यावर ठेवतील विश्वास!

वृश्चिक: शुक्र आणि सूर्याची युती तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीतील ११ व्या भावात तयार होणार आहे. ज्याला उत्पन्न आणि नफ्याचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो. तसंच यावेळी व्यवसायात एक करार अंतिम होता होता राहू शकतो. वाहने जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. या काळात शेअर बाजार आणि सट्टा लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे टाळा.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022: १२ वर्षांनंतर यंदा १६ दिवसांचे श्राद्ध, जाणून घ्या सविस्तर…

धनु: शुक्र आणि सूर्य यांची युती तुमच्यासाठी कठीण ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या घरात तयार होणार आहे. ज्याला व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा बॉसशी भांडण होऊ शकते. यावेळी तुम्हाला व्यवसायात कमी फायदा होईल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.