scorecardresearch

Pitru Paksha 2022: १२ वर्षांनंतर यंदा १६ दिवसांचे श्राद्ध, जाणून घ्या सविस्तर…

पंचांगानुसार, १२ वर्षांनंतर यंदाच्या वर्षी १६ दिवस श्राद्ध होत आहे. जे शुभ मानले जात नाही.

Pitru-Paksha-2022

Pitru Paksha 2022: दरवर्षी पितृ पक्ष १५ दिवसांवर येतो. या दिवशी पितरांचे श्राद्ध विधी आणि तर्पण केले जातात. तसेच पितरांचे आशीर्वाद घेतले जातात आणि चुकांची क्षमा मागितली जाते. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. यावर्षी पितृपक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत असून २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पंचांगानुसार, १२ वर्षांनंतर यंदाच्या वर्षी १६ दिवस श्राद्ध होत आहे. जे शुभ मानले जात नाही. कारण शास्त्रात श्राद्धाच्या तिथी वाढवणे शुभ मानले जात नाही. त्याचबरोबर १७ सप्टेंबरला श्राद्ध होणार नाही. चला जाणून घेऊया कुटूप आणि रोहणा श्राद्धाच्या तारखा आणि मुहूर्त…

पितृपक्षाचे शुभ मुहूर्त
शास्त्रानुसार पितृपक्ष श्राद्ध आणि पर्वश्राद्ध असतात आणि ते करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे कुतुप मुहूर्त आणि रोहिणी मुहूर्त. त्यानंतर पूजा असते. गंगाजीमध्ये तर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्यामध्ये सूर्याकडे तोंड करून ओंजळीतून जल अर्पण केलं जातं. असं मानलं जातं की श्राद्ध पक्षामध्ये पितर स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून अन्न आणि पाण्याची अपेक्षा करतात. शनिवार १० सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्ध सुरू होत आहे, चला जाणून घेऊया या दिवसाचे कुटूप आणि रोहणा मुहूर्त.

आणखी वाचा : Chanakya Niti: या ३ कारणांमुळे पती-पत्नीमधला दूरावा वाढतो, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र

कुटूप मुहूर्त – दुपारी १२.१० ते दुपारी ०१.००, कालावधी ५० मिनिटे
रोहणा मुहूर्त – दुपारी ०१.०० ते ०१.४८, कालावधी: ४८ मिनिटे
अपराह्न मुहूर्त– ०१.४९ अपराह्न ते ०४.१६ अपराह्न, कालावधी: २ तास २७ मिनिटे

आणखी वाचा : Chanakya Niti: बँक बॅलन्स, सुख-शांती सर्व काही नष्ट करतात ‘या’ ३ चुका, अपयशी बनवतात!

कधी आणि कोणत्या तारीखेला कोणतं श्राद्ध?

दिवस – श्राद्ध
१० सप्टेंबर – प्रतिपदा श्राद्ध
११ सप्टेंबर – द्वितीयेचे श्राद्ध
१२ सप्टेंबर – तृतीयेचे श्राद्ध
१३ सप्टेंबर – चतुर्थी श्राद्ध
१४ सप्टेंबर – पंचमीचे श्राद्ध, भरणी नक्षत्राचे श्राद्ध
१५ सप्टेंबर – षष्ठीचे श्राद्ध, कृतिका नक्षत्राचे श्राद्ध
१६ सप्टेंबर – सप्तमी श्राद्ध
१७ सप्टेंबर – या दिवशी श्राद्ध नाही
१८ सप्टेंबर – अष्टमी श्राद्ध
१९ सप्टेंबर – नवमी श्राद्ध, सौभाग्यवती श्राद्ध
२० सप्टेंबर – दशमी श्राद्ध

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 23:08 IST

संबंधित बातम्या