11th May 2024 Panchang & Rashi Bhavishya: ११ मे २०२४ ला वैशाख शुक्ल चतुर्थी व शनिवारचा योगायोग एकत्र जुळून आला आहे. शनिवारी रात्री २ वाजून ५ मिनिटांपर्यंत चतुर्थी कायम असणार आहे. ११ मे ला सकाळी १० वाजून ४ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग राहणार आहे. यानंतर धृती योग जागृत होईल. शनिवारी सकाळी १० वाजून १६ मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र जागृत असणार आहे व नंतर आर्द्रा नक्षत्र सक्रिय होईल. ११ मेला विनायकी चतुर्थी सुद्धा आहे. या दिवशी मेष ते मीन राशीतील कुणाला काय लाभ होणार हे पाहूया..

११ मे राशी भविष्य व पंचांग (विनायक चतुर्थी विशेष)

मेष:-मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.

16th June Panchang & Rashi Bhavishya Marathi
१६ जून पंचांग: सूर्य चमकणार! जूनच्या सर्वात शुभ रविवारी मेष ते मीन राशींना कशी साथ देईल नशीब, वाचा तुमचं राशी भविष्य
Vat Purnima 2024
२१ की २२ जून, वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे? ३ मोठे राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या आर्थिक, वैवाहिक जीवनात येईल सुख
15th June Panchang & Rashi Bhavishya
१५ जून पंचांग: लक्ष्मी नारायण योग सक्रिय, हस्त नक्षत्र जागृत; आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात सुख- धनाचा पाऊस?
14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
The grace of Goddess Lakshmi will be on the persons of these three zodiac signs
सूर्य करणार कमाल, तुम्ही होणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Lakshmi Narayan Yoga will be created on June 14
पैसाच पैसा! १४ जूनला निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
After a year Shukraditya Rajayoga was created
देवी लक्ष्मीची अपार कृपा; एक वर्षानंतर निर्माण झाला ‘शुक्रादित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
Shukra Nakshatra Parivartan
७ जूनपासून शुक्रदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे उजळेल नशीब? शुक्रदेव नक्षत्र बदल करताच लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळू शकतो अपार पैसा

वृषभ:-सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.

मिथुन:-प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

कर्क:-कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

सिंह:-कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.

कन्या:-कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.

तूळ:-मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. जुगारापासून दूर राहावे. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

वृश्चिक:-चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.

धनू:-कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.

मकर:-मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ:-क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींना देखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.

हे ही वाचा<< २१ दिवस ‘या’ ४ राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण; अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळपासून बुध देणार बुद्धी व धनाचे दान

मीन:-मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर