वैदिक पंचांगानुसार देवांचा गुरु सध्या मेष राशीत विराजमान झाले आहेत, याच राशीत चंद्र देखील विराजमान आहे. तसेच बुध आणि राहू मेष राशीत विराजमान आहेत. मेष राशीत चार ग्रह एकत्र आल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. चतुर्ग्रही योग हा शुभ योगांपैकी एक मानला जातो. ज्याचा अनेक राशींना विशेष लाभ मिळू शकतो तर काही राशींनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष राशीत चतुर्ग्रही योग बनल्यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊया.

कर्क राशी –

Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Trigrahi Yog in Aries
त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….

कर्क राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योग तयार झाल्याने विशेष लाभ होऊ शकतो. हा योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत विशेष लाभ मिळू शकतो. यासोबतच दीर्घकाळ थांबलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. तर अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला समाजात मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. यासोबतच मुलांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते.

हेही वाचा- येत्या ३५ दिवसांत बक्कळ पैसा कमावणार ‘या’ राशींचे लोक? नोकरी-व्यापारात होऊ शकतो मोठा लाभ!

वृश्चिक –

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमचे प्रमोशन आणि पगारवाढ होऊ शकते. शिवाय तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करू शकता. यासोबतच तुम्ही कुटुंब आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळू शकते. नशिबाच्या साथीने तुम्हाला गुंतवणुकीतही फायदा होऊ शकतो.

हेही वाचा- ७ जूनपासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? बुधादित्य राजयोगामुळे मिळू शकतो बक्कळ पैसा, नशीबही चमकणार?

मकर –

चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. यासोबतच व्यवसाय आणि नोकरीतही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोत उघडण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

मीन –

मीन राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो आणि आरोग्यही चांगले राहू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)