लोखंडाच्या धातुकापासून लोखंड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झोतभट्टीत लोखंडाच्या धातुकाबरोबर चुनखडकाचे तुकडे आणि कोक एकत्र करून तापवतात. त्यासाठी लागणारा कोक दगडी कोळशावर किंवा खनिज तेलावर विशिष्ट प्रक्रिया करून तयार करतात. त्या प्रक्रियेला भंजक ऊर्ध्वपातन (डिस्ट्रिक्टिव डिस्टिलेशन) असे म्हणतात.