छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठवाड्यात एप्रिलमध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी दत्ता काशिनाथ महिपाल-पाटील या २५ वर्षीय शेतकरी तरुणाने आत्महत्या केली. त्याने माजलगाव येथील गोपाळा बँकेकडून एक लाखांचे कर्ज घेतले होते. एका बाजूला आत्महत्यांचा आकडा वाढत असतानाच मराठवाड्यातील पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली आहे.

हेही वाचा >>> बीडमध्ये एक कोटींची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात तक्रार

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
cash jewelry immovable property found with police inspector haribhau khade
एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याकडे घबाड सापडले; एक कोटी रोख, ७२ लाखांचे दागिने व स्थावर मालमत्ता
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
loksatta editorial joe biden imposes heavy import tariffs on chinese imports
अग्रलेख : बाजार कुणाचा उठला…
Ghatkopar incident
VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

बीड जिल्ह्यात जेव्हा जातीय प्रचाराने टोक गाठले होते तेव्हा (एप्रिल महिन्यात) सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्रचार काळात कृषी मालाच्या पडलेल्या भावाचा मुद्दाही चर्चेत आला होता. अनेक भागांत शेतकऱ्यांनी उमेदवारांना घसरलेल्या भावावरून प्रश्न विचारले.

दीड वर्षापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने तयार केलेल्या अहवालानुसार २०१२ ते २०२२ पर्यंत ८,७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील दत्ता कालिदास महिपाल याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बँकेकडून तगादा सुरू असल्याने त्रस्त आहे. मोठे कर्ज घेणारे परदेशी पळून जातात आणि छोट्या कर्जदारांना बँक त्रास देते,’’ असे म्हटले आहे.