छत्रपती संभाजीनगर – मतदान केल्याची बोटावरील शाई रीन फॅब्रिक व्हाईटनरने पुसून टाकत बोगस मतदान केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील शीघ्रकृती दलाचे अंमलदार प्रेमसिंग उत्तमराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मोबीन शेख जलील अहेमद (वय ३५, शहा काॅलनी), सय्यद साजीद सय्यद जाबेर (वय २७), अनिस खान मसूद खान (४१), सय्यद सलाउद्दीन शकूर सालार (तिघेही बुढ्ढीलाईन), तारेख बाबू खान (मिलकाॅर्नर) व मुद्दसीर इमरान खान (कोतवालपुरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी रोकड जप्त

हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव; उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले…

१३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाचा दिवस होता. सकाळच्यावेळेत बुढ्ढीलाईन, सागर ऑप्टिकलजवळ, ज्युब्ली पार्कमधील महावितरण कार्यालय परिसरात वरील आरोपी बोगस मतदान करण्याच्या उद्देशाने बोटावरील शाई रीन फॅब्रिक व्हाईटनरने पुसताना आढळून आले. त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बाटली, पाण्यासारखे द्रव असलेली एक अत्तराची काचेची बाटली, आदी माल जप्त करण्यात आला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajinagar case against six persons in case of bogus voting ssb