लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या तंत्रज्ञास शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका ग्राहकावर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमद असे आरोपीचे नाव आहे.

three way battle in the chhatrapati sambhajinagar lok sabha constituency
मागोवा : मतदानाच्या प्रारूपात जात आणि धर्म दोन्ही आघाडीवर
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Chhatrapati sambhajinagar marathi news
छत्रपती संभाजीनगर: स्ट्राँग रुम आवारात वाहन धडकवणारा महावितरणाचा अभियंता निलंबित
threatened, company officials ,
कंपनीच्या जमीन व्यवहारासाठी दोन कोटींची खंडणी; केजमध्ये गुन्हा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ प्रेमचंद चव्हाण हे दोघे सोमवारी (२७ मे) दुपारी ग्राहकांना वीजबिल थकबाकी वसुलीबाबत फोन करत होते. त्यावेळी आरोपी कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमद हा नारेगाव नाला डीपीचा फ्युज गेला असे म्हणत कार्यालयात येऊन शिव्या देऊ लागला. त्यांची वीज जोडणी नारेगाव नाला डीपीची आहे का? हे तपासण्यासाठी त्यांना चव्हाण यांनी लाईट बिलची प्रत मागितली असता आरोपीने शिवीगाळ केली. तसेच चव्हाण यांची कॉलर धरुन मारहाण केली.

आणखी वाचा-Pune Car Accident Case : विरोधी पक्ष माध्यमांना घेऊन स्टंट बाजी करत आहेत – शंभुराज देसाई

चव्हाण यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्यांना आरोपीने चप्पल काढून मारली. तुला छाटुन टाकीन असे म्हणत फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर चव्हाण यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यावरून आरोपी कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.