छत्रपती संभाजीनगर –  डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका विश्रामगृह परिसरात गुरुवारी रात्री ११.५० च्या सुमारास लाग लागल्याची घटना घडली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मालवीय मिशनच्या शिक्षक प्रशिक्षण केंद्र परिसरात असलेल्या या विश्रामगृहाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात आग पसरत असल्याचे लक्षात येताच तातडीने अग्निशमन दल विभागास कळवण्यात आले. मध्यरात्री १२.२० च्या सुमारास अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. आगीचे नेमके कारण मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. विद्यापीठ प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major fire at marathwada university premises zws
First published on: 19-04-2024 at 01:23 IST