03 August 2020

News Flash

Ishita

लग्नाआधीच पोलीस वर गायब; वधूपक्षाचा पोलीस ठाण्यात ठिय्या

लग्नाच्या आदल्या दिवशीच पोलीस शिपाई असलेल्या नवरदेवाने घरातून पलायन केल्याने वधूपक्षाकडील मंडळींना पोलीस ठाण्यात धाव घेऊन ठिय्या मारावा लागला.
नरेंद्र मारूती बाबर (वय २५, रा. शहर पोलीस मुख्यालय, सोलापूर) असे गायब झालेल्या पोलीस नवरदेवाचे नाव आहे.

वाईलगतच्या ग्रामीण भागात बेकायदा बांधकामे

वाई शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींचा व ग्रामीण भागाचा आधार घेऊन या परिसरात मोठय़ा प्रमाणात नियमबाहय़ व बेकायदेशीर बांधकामे होत असून, शासकीय यंत्रणांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. विशेषत: वाई तहसील व प्रांत कार्यालयाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

गोकुळ दूध संघाचे उच्चांकी दूधसंकलन

राज्यात प्रथम, देशात व्दितीय तर जगात सोळाव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दूध संघाने (गोकुळ) प्रतिदिन ९ लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा ओलांडला आहे. गोकुळने नुकतेच दिवसाला ९ लाख ३० हजार २७८ लिटर्स इतके दूध संकलन करून या वर्षीची एक दिवसाची उच्चांकी दूधसंकलनाची नोंद केलेली आहे, अशी माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी येथे दिली.

माघी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाख भाविक

माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यातील सर्व भागातून वारकरी, भाविकभक्त येत असून माघी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत सुमारे दोन लाख वारकरी भाविक आले आहेत. पदस्पर्श दर्शनाची रांग मंगळवारी वैकुंठभूमी स्मशानसमोर उभारलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत गेली असून तीनही पत्राशेडमधून गर्दी आहे. २१ फेब्रुवारीला माघी एकादशी सोहळा आहे. येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीकरता पंढरपूर नगरपरिषद व प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेवर दुष्काळाचे सावट असले तरी वारकरी विठ्ठलावर भरवसा ठेवून एक दिवस का होईना पंढरीत भक्तीसेवा अर्पण करीत आहेत.

यंत्रमाग कामगारांचा उद्या मोर्चा

जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी यंत्रमाग कामगारांसाठी ८५ पैसे मजुरी देण्याचा प्रस्ताव मंगळवारी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीने स्वीकारला आहे. मात्र त्यांनी दिलेला १६.६६ टक्के बोनसचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ८५ पैसे मजुरीचा निर्णय अमलात आणावा, या मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

कराडचे ग्रामदैवत उत्तरालक्ष्मीचा गुरूवारपासून यात्रा उत्सव

कराडचे ग्रामदैवत श्री उत्तरालक्ष्मी देवीचा माघ पौर्णिमा यात्रा उत्सव येत्या गुरूवारी (दि. २१) सालाबादप्रमाणे पालखी प्रदक्षिणेने सुरू होत आहे. हा यात्रा उत्सव नियमित धार्मिक कार्यक्रमाने २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीप्रश्नी तिढा कायम

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नी सोमवारी रात्री अडीच तास चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. कामगार मंत्र्यांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरल्याने ताणलेल्या या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी समन्वय घडविण्यासाठी ५२ पिकाला ८५ पैसे टक्के मजुरी व १६ टक्के बोनस आणि बोनस नको असेल तर ९९ पैसे मजुरी असा प्रस्ताव दिला. मात्र बैठक संपल्यानंतर यंत्रमागधारक प्रतिनिधींनी हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितल्याने या प्रश्नाची कोंडी आणखी वाढीस लागली आहे.

शिवरायांच्या प्राचीन मंदिराचा शोध घेण्यात सह्य़ाद्री प्रतिष्ठानला यश

छत्रपती शिवराय यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या टेंबलाई टेकडीवर उभारलेल्या परंतु काळाच्या ओघात नष्ट झालेल्या छत्रपती शिवरायांच्या मंदिराचा शोध घेण्यात सह्य़ाद्री प्रतिष्ठानला यश आले आहे.सह्य़ाद्रीच्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कोल्हापुरातील पहिल्या शिवमंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे प्रसारमाध्यमांसमोर दाखवून दिले.

टीडीआर घोटाळय़ात कोल्हापूर पालिकेला साडेसात कोटींचा भुर्दंड बसल्याचा आरोप

कोल्हापूर शहरात झालेल्या टीडीआर घोटाळय़ावरून सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. साळुंखेनगरातील २ एकर जागेवरून महापालिकेची दिशाभूल करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अद्याप कारवाई केली का जात नाही, असा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. दिशाभूल केल्याने महापालिकेला साडेसात कोटींचा भरुदड बसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सतेज पाटील यांच्यावरील आरोपाच्या निषेधार्थ कसबा बावडा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाच्या निषेधार्थ कसबा बावडा बंदला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तर काल रात्री झालेल्या सभेत आरोप करणाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवारी काँग्रेसच्या नऊ तालुकाध्यक्षांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

बारावी लेखी परीक्षेच्या मूल्यमापनावर शिक्षक संघाचा बहिष्कार

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या आदेशानुसार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांच्या मूल्यमापनाचे कामकाज मुख्य नियामक, वरिष्ठ नियामक हे नियामक व परीक्षण करणार नाहीत, असे पत्रक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. उमाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

बलात्काराच्या दोन खटल्यांत पाच आरोपींना शिक्षा व दंड

बलात्काराच्या दोन खटल्यांत सोलापूरच्या सत्र न्यायालयाने पाच आरोपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यापैकी एका खटल्यातील पीडित तरुणी व तिच्या मुलाला आरोपींकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेतून दोन लाखांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने सुनावला आहे.

बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न

पंढरपूर येथील नवीन बसस्थानकात गावाकडे जाण्यास उभ्या असलेल्या सतरा वर्षांच्या युवतीला बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून ओमनी गाडीत घालून पळवून नेत असताना मुलीने ओरड केल्याने रिक्षाचालक, नागरिकांनी एकाला पकडले तर तिघे गाडी घेऊन पसार झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० ते १च्या दरम्यान घडला

शिरोळ येथील दोन संस्थात तांत्रिक शिक्षणासाठी सामंजस्य करार

शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज व तुलशी कास्टिंग्ज अँड मशिनिंग लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे या उभय संस्थांत तांत्रिक अभ्यासासंदर्भात तसेच विद्यार्थ्यांना प्रगत माहिती आणि तंत्रज्ञान व संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे.

रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांना नटश्रेष्ठ दानवे पुरस्कार

कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे दिला जाणारा ‘कलायात्री पुरस्कार’ यंदा या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. इंडियन डेअरी असो. दिल्लीचे उपाध्यक्ष अरुण नरके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून १ मार्चला राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी ४.३०ला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

महाबळेश्वरला जोरदार पाऊस

वाई-पाचगणी-महाबळेश्वर परिसरात अचानक झालेल्या बिगर मोसमी पावसाने गहू,ज्वारी व स्ट्रॉबेरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाई-पाचगणी महाबळेश्वर भागात बिगरमोसमी पाऊस झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

राज ठाकरे हेच ‘भंपक’ अजित पवारांचा टोला

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील बारकावे पाहावे लागतात आणि त्याचा उपयोग दुष्काळाबाबत धोरणात्मक निर्णय घेताना होतो. परंतु दुष्काळी भागाला मंत्र्यांनी भेट देण्यास ‘भंपकपणा’ असल्याचे कोणी म्हणत असतील तर तेच स्वत: भंपक आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.

आलमट्टीचे पाणी सोलापूरला देण्यास कर्नाटकचा प्रतिसाद नाही

टंचाईग्रस्त सोलापूरसाठी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी देण्याबाबत कर्नाटक सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे यातून सकारात्मक मार्ग निघेल, असे दिसत नसल्याने या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे लक्ष घालतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.

खून प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने वस्तुस्थिती स्पष्ट- सतेज पाटील

अशोक पाटील खून प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने वस्तुस्थिती पुढे आली आहे. तरीही धनंजय महाडिक यांच्याकडून आपल्यावर गुन्हेगारांना पाठबळ देत असल्याचा आरोप होत आहे. खरेतर महाडिक हेच गेली ४० वर्षे दोन नंबर धंद्यामध्ये असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. अशांकडून नार्को स्टेटची मागणी होत आहे. मात्र आपली प्रतिमा स्वच्छ असल्याने नार्को टेस्टच्या पुढचीही टेस्ट करण्याची तयारी आहे, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.

अशोक पाटील खून प्रकरणातील चारही आरोपींना १४ दिवसांची कोठडी

अशोक पाटील खूनप्रकरणातील चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अशोक पाटील यांचा चार दिवसांपूर्वी गोळय़ा झाडून खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शनिवारी पोलिसांनी कोगनोळी नाका येथे पकडले होते. खुनासाठी वापरलेली हत्यारे व वाहनेही जप्त केली होती. आरोपींना पुढील तपासासाठी गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.

स्वामी नरेंद्रानंदांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा

मध्य प्रदेश शासनाने कांची सुमेरू पीठाचे स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांना ताब्यात घेऊन अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. सत्ता मिळविण्यासाठी केवळ हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.

आंतर विद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धत तिरुवेल्लोर विद्यापीठाला विजेतेपद

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत तिरुवेल्लोर विद्यापीठाने मणिपूर विद्यापीठाचा ३ विरुद्ध १ गोलने सहजरीत्या पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मधुराई विद्यापीठाला ३ विरुद्ध शून्य गोलने हरवून कुरुक्षेत्र विद्यापीठाने तिसरे स्थान पटकाविले.

अशोक पाटील खुनाचा तपास गुप्तचर विभागाकडे

पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या खुनाचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या विभागाची चार पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. तर या प्रकरणामध्ये गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना महाडिक काका-पुतण्या हे राजकारणासाठी गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

सोलापुरात राज ठाकरेंच्या सभेसाठी नॉर्थकोटऐवजी दुसऱ्या मैदानाचा शोध

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या २२ फेब्रुवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येणार असून त्या दिवशी त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु निश्चित केलेले सभेचे ठिकाण कोल्हापूरचा अनुभव विचारात घेता तोकडे पडण्याची शक्यता विचारात घेऊन आता सभेसाठी अन्य मैदानांचा शोध मनसेची मंडळी घेत आहेत.

Just Now!
X