पुणे : लष्कर भागात भरधाव मोटारींनी एकापाठोपाठ दहा दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली. मोटारचालकाला अचानक अपस्माराचा झटका आल्याने ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत एक दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.   याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा मोटारचालक रवींद्र धनवटे (वय ३२, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनवटे हा अंकीत छाजेड यांच्या मोटारीवर चालक आहे. छाजेड यांच्या मुलीला नृत्यवर्गास सोडून दुपारी तीनच्या सुमारास धनवटे मोटारीतून निघाला होता. लष्कर भागातील जाफरीन लेन परिसरात मोटारचालक धनवटेला अचानक अपस्माराचा झटका आला. त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारीने एकापाठोपाठ दहा दुचाकीस्वारांना धडक दिली.

 काही अंतरावर मोटार जाऊन थांबली. अपघातात दुचाकीस्वार अतिक शौकतअली खत्री (वय २९, रा. इंदूर) जखमी झाला असून, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माेटारीची धडक एवढी जोरात होती की, मोटारीतील एअर बॅग यंत्रणा कार्यान्वित झाली. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली. मोटारचालक धनवटे याला बाहेर काढण्यात आले. अपस्माराचा झटका आलेल्या धनवटे काही वेळानंतर शुद्धीवर आले. त्यानंतर मोटारमालकाला या घटनेची माहिती देण्यात आली.

reasi terror attack combing operation underway
चौकशीसाठी २० जण ताब्यात; रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू
Mumbai girl suicide marathi news
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना
Massage by young man to police officer The footage of the incident in Kalyaninagar went viral
तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याची मालिश; कल्याणीनगरमधील घटनेची चित्रफित व्हायरल
pune, Rickshaw Driver Assaulted Police Constable, Driver Assaults Police, Vehicle Investigation , Hadapsar,
पुणे : रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?
Kalyaninagar, Police action,
कल्याणीनगर अपघातानंतर पोलिसांची कारवाई तीव्र, किती मद्यपी वाहनचालक जाळ्यात?
N.M. Joshi Marg, BDD Redevelopment,
ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास : म्हाडाने काढलेली घरांची सोडत रहिवाशांना अमान्य, भेदभाव झाल्याचा आरोप, न्यायालयात धाव
Pune Porsche Accident  Dealers will be in trouble if an unregistered vehicle is found pune
Pune Porsche Accident : आरटीओचे मोठे पाऊल : विनानोंदणी वाहन दिसल्यास वितरक अडचणीत येणार
Police reminded of pub rules after tragedy Police Commissioners order to close pubs and bars on time
दुर्घटनेनंतर पोलिसांना पबच्या नियमावलीची आठवण; पब, बार वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश

हेही वाचा >>>अजित पवारांना ‘क्लिन चीट’, ‘कचाकचा बटन दाबा’ वक्तव्य; आचारसंहिता भंगची तक्रार फेटाळली

मोटारचालकाला अपस्माराचा झटका आल्याने दुर्घटना घडल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. अपघातातात दहा दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर यांनी दिली.