Honda Motorcycle Sale: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीची भारतीय बाजारात दमदार कामगिरी होत आहे. कंपनी दिवसेंदिवस त्यांच्या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. दुचाकी वाहनांमध्ये १२५ सीसी इंजिन असलेल्या बाईकला मोठी मागणी आहे. आता कंपनीच्या बाईकनं बाजारपेठेत मोठा विक्रम नोंदविला आहे. भारतीय ग्राहकांनी होंडाच्या बाईकला खूप पसंत केले आहे.

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने सांगितले की, त्यांच्या शाईन बाईकच्या ३० लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. हे कंपनीसाठी आणखी एक मैलाचा दगड गाठण्यासारखे आहे. होंडाने ११ वर्षांत पहिले १५ लाख ग्राहक मिळवले. नंतर ते दुप्पट वेगाने वाढले आणि अलीकडेच केवळ ६.५ वर्षांत १५ लाख ग्राहक मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारण महाराष्ट्रात या बाईकच्या २० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झालीये.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही

Honda Shine 125 मध्ये काय आहे खास

होंडा शाईन ही भारतीय बाजारात १२५ सीसी सेगमेंट मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी बाईक ठरली आहे. ही हिरो मोटोकॉर्पची एक खूपच लोकप्रिय बाईक आहे. होंडा शाइन मध्ये १२३.९४ सीसीचे सिंगल सिलिंडर एसआय इंजिन दिले आहे. जे ७.९ kW चे मॅक्सिमम पॉवर आणि ११ एनएम चे पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड गियरबॉक्स सोबत येते. ही बाईक ५ कलर ऑप्शन मध्ये येते. Honda Shine 125 ची किंमत ७८ हजार ६८७ रुपयांपासून सुरू होते, ८२ हजार ६८७ रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. ही बाईक ६५ Kmpl चा जबरदस्त मायलेज देते.