Top 5 Bikes: भारतात सध्या पेट्रोल दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज असणाऱ्या मोटारसायकलचे पर्याय शोधत आहेत. चांगलं मायलेज देणाऱ्या भारतातील पाच बाईक्सची माहिती आज आपण घेणार आहोत. तुम्ही जर शक्तिशाली मोटरसायकल शोधत असाल तर बाजारात कोणत्या बाईकला सर्वाधिक मागणी आहे. हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. म्हणूनच जाणून घ्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या या टॉप ५ बाईक कोणत्या आहेत.

Hero Splendor

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

९७.२ सीसी इतकी इंजीन क्षमता असलेली ही बाईक सर्वाधिक भारतीयांची पहिली पसंती आहे. या गाडीची अतिरिक्त पॉवर ८.२४ बीएचपी इतकी आहे आणि ही गाडी प्रति लीटर ७० किलोमिटर इतके अंतर कापत असल्याचा दावा करते. हिरो स्प्लेंडरची ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याची २,६१,७२१ युनिट्सची विक्री झाली आहे.

Honda’s CB Shine

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाची ही बाईक देशातील ग्राहकांची पसंतीची बाईक आहे. इंजीन क्षमता १२४.७ सीसी इतकी असलेल्या या बाईकची अतिरिक्त पॉवर ७५०० आरपीएम वर १०.१६ बीएचपी इतकी आहे. प्रति लीटर ६५ किलोमीटर इतके अंतर ही बाईक कापत असल्याचा कंपनी दावा करते. ऑक्टोबर २०२२ मध्ये Honda CB Shine चे १,३०,९१६ युनिट्स विकले गेले आहेत.

(आणखी वाचा : Honda Discount Offer: मस्तच! अवघ्या ३ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करा होंडा स्कूटर आणि बाइक्स; जाणून घ्या आकर्षक ऑफर )

Bajaj Pulsar

टू-व्हीलर्सचे निर्माता बजाज कंपनीची बजाज पल्सर भारतीयांची आवडती मोटारसायकल आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, पल्सर मालिकेच्या १,१३,८७० युनिट्सची विक्री झाली आहे. त्याच्या विक्रीत ३१.६४% वाढ झाली आहे.

Hero’s HF Deluxe

हीरो मोटोकॉर्पची ही बाईक देशातील ग्राहकांची पसंती आहे. या गाडीच्या इंजीनची क्षमता ९७.२ सीसी इतकी आहे. हिची अतिरिक्त पॉवर ८.२४ इतकी आहे. प्रति लीटर ८३ किलोमीटर इतके अंतर ही बाईक कापत असल्याचा दावा कंपनी करते. हिरोची एचएफ डिलक्सने ऑक्टोबर २०२२ मध्ये ७८,०७६ युनिट्स विकल्या आहेत.

Bajaj Platina

बजाज प्लॅटिना ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. त्याचे इंजिन ७००० आरपीएमवर ८.६ PS कमाल पॉवर आणि ५००० आरपीएमवर ९.६१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. Platina चे इंजिन -स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. बजाज प्लॅटिनाची ऑक्टोबर २०२२ मध्ये ५७,८४२ युनिट्सची विक्री झाली आहे.