तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे, मात्र तुमच्याकडे कार नाही. आणि तुमचा कल कार घेण्याकडे असेल तर बाजारात काही वापरलेल्या सेकंड हँड कार आहेत ज्या तुम्हाला अ‍ॅप्पल आयफोन १४ प्रो मॅक्स १ टीबीच्या किंमतीत मिळू शकतात. या फोनची किंमत १.४० ते १.९० लाख रुपये इतकी आहे. आयफोन घेण्यापूर्वी तुम्ही कार घेऊन संपूर्ण कुटुंबाला सरप्राइज देऊ शकता.

या आहे आयफोनच्या किंमतीत येणाऱ्या कार

१) ह्युंडाई i10

ह्युंडाई i10 ही मारुती सुझुकीची फार गाजलेली कार आहे. ह्युंडाईचे प्रि फेसलिफ्ट मॉडेल तुम्हाला १.6 लाखांपेक्षाही कमी किंमतीत मिळू शकते. ह्युंडाई i10 दोन इंजिन पर्यायांसोबत उपलब्ध झाली होती. त्यात १.१ लिटर इंजिन आणि १.२ लिटर इंजिनचा समावेश आहे. ह्युंडाईचे इंटेरियर चांगले आहे, मात्र ती मायलेजच्या बाबतीत आल्टोच्या खूप मागे आहे.

(फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या)

२) मारुती सुझुकी आल्टो

आल्टो ही छोटी कार असून ती तिच्या चांगल्या मायलेजमुळे ओळखली जाते. ही ५ सिटर कार असून तिला ७९६ सीसीचे ३ सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे ४७ बीएचपीचे पावर आणि ६९ एनएमचे टॉर्क देते. कार दमदार मायलेज देते, तसेच त्यात पावर विंडो आणि पावर स्टियरिंग सारखे फीचरही मिळतात. ही कार तुम्हाला १.५० लाख ते १.८० लाखांच्या दरम्यान मिळू शकते.

3) ह्युंडाई सँट्रो

ह्युंडाई सँट्रो ग्राहकांच्या फार पसंतीस उतरली नाही. मात्र ह्युंडाई सँट्रो झिंग मॉडेल हे १.२० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकते. या कारमध्ये १.१ लिटरचे, ४ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार ६२ बीएचपीची पावर जनरेट करू शकते.

(तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजवर असू शकते दुसऱ्याची नजर; त्वरीत चेक करा ‘हे’ फीचर)

४) रेनो क्विड

आल्टो प्रमाणे रेनो क्विड देखील कमी किमतीत मिळू शकते. या कारच्या सेकंड हँड मॉडेलची किंमत १.५० ते १.८० लाख इतकी आहे. कारमध्ये दोन इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत. ०.८ लिटर इंजिन ५३.२६ बीएचपीची पावर आणि ७२ एनएमचा टॉर्क देतो. तर १.० लिटर इंजिन ६७.०६ बीएचपीची पावर आणि ९१ एनएमचा टॉर्क देतो.

(या बातमीमध्ये देण्यात आलेली कारची किंमत ऑनलाइन माध्यमांचे निरीक्षण करून दिलेली आहे. दुसऱ्या संकेतस्थळांवर किंमत वेगळी असू शकते)