Premium

BMW ने भारतात ‘ही’ गाडी केली लॉन्च! काय आहेत या भन्नाट गाडीचे फीचर्स आणि किंमत पाहा….

बीएमडब्ल्यूची X4 M40i ही एसयूव्ही गाडी आता भारतात उपलब्ध होणार असून, तिचे फीचर्स, किंमत आणि बुकिंगबद्दल माहिती जाणून घ्या.

BMW X4 M40i price and features
बीएमडब्ल्यूची X4 M40i लक्झरी एसयूव्ही गाडीची किंमत पाहा. [Photo credit – Indian express]

नवी दिल्ली : लक्झरी वाहने व मोटरसायकलीचे जर्मनीतील बहुराष्ट्रीय निर्माते बीएमडब्ल्यू या कंपनीने आपल्या BMW X4 M40i ही लक्झरी एसयूव्ही गाडी भारतात लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. “बीएमडब्ल्यू X४ ने भारतात कूप या विशिष्ट खेळाची संकल्पना लोकप्रिय केली आहे. त्यामुळे ज्यांची आवड-निवड इतर लोकांपेक्षा वेगळी आहे त्यांनी या गाडीला आपली पसंती दाखवली आहे. त्यामुळे आता बीएमडब्ल्यूची X4 M40i या गाडीची घोषणा करताना आम्ही फार उत्सुक असून, त्याची ओळख ही एम पॉवरच्या भरघोस यशाची आणि एम एडिशनच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेचा पुरावा आहे, असे म्हणू शकतो. सर्वोत्तम काम करण्यासाठी इंजिनियरिंग केलेली आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी डिझाईन केलेली BMW X4 M40i ही एक अतिशय उत्कृष्ट कामगिरीसाठी तयार केली गेली आहे. तिची काम करण्याची शैली, त्या गाडीचे दिसणे आणि यासोबतच त्याच्या वाढलेल्या शक्तीसह तुम्ही सर्वांमध्ये नक्कीच वेगळे आणि उठून दिसाल.” असे पीटीआयने [PTI] भारतातील बीएमडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष, विक्रम पावहबद्दल एका अहवालात सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BMW X4 M40i ही सीबीयू [कंप्लिटली बिल्टअप युनिट]द्वारे भारतात आणली जाणार असल्याचे पीटीआयच्या माहितीनुसार समजते.

हेही वाचा : ॲपल वॉचची बॅटरी सारखी ड्रेन होत आहे? watchOS 10.1 अपडेट नंतर ‘हे’ जुगाड करून पाहा…

BMW X4 M40i या गाडीची खासियत काय आहे ते पाहा :

 • या लक्झरी एसयूव्हीमध्ये, ३.० लिटर बीएमडब्ल्यू एम ट्वीन शक्ती टर्बो इनलाईनचे सहा सिलिंडरचे पेट्रोल इंजिन असणार आहे.
 • या गाडीचे इंजिन, १९०० ते ५००० आरपीएम वर २६५ केडब्ल्यू/ ३६० एचपी आउटपुट आणि ५०० एनएम टॉर्क [torque] निर्माण करू शकते.
 • ही गाडी ० ते १०० किमी/ताशी वेग २५० किमी/तास इतकी प्रचंड गती केवळ ४.९ सेकंदांमध्ये घेऊ शकते.
 • ४८ व्होल्टचे सौम्य हायब्रीड तंत्रज्ञान इंधनाचा वापर कमी करण्यासाठी मदत करून, गाडी चालवण्यास आरामदायी अनुभव देते.
 • बीएमडब्ल्यू X4 M40i या गाडीचे इंजिन 8-स्पीड स्टेप्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह येते.
 • ही लक्झरी एसयूव्ही, बीएमडब्ल्यू एक्स ड्राइव्ह ऑल व्हील तंत्रज्ञानासह सज्ज असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने, गाडी चालवण्यावर लक्ष ठेवले जाते, त्याचसोबत जास्त चपळता व गाडीच्या स्थिरतेसाठी त्वरित प्रतिसाद देते.
 • या नवीन X4 M401 मध्ये कूप एसयूव्ही सिल्हूटचा [silhouette] समावेश केला आहे.
 • गाडीच्या समोरील बाजूस क्रोम फ्रेमसह एम किडनी ग्रिल, काळ्या रंगाच्या हाय-ग्लॉसमध्ये डबल किडनी बार आणि एम लोगो गाडीच्या अॅथलेटिक शक्तीचे प्रदर्शन करते.
 • या गाडीमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह एलईडी हेडलॅम्प लावण्यात आले आहेत.
 • X4 M40i गाडीमध्ये दोन दात असल्याप्रमाणे क्रोम काळ्या रंगाचे टेलपाईप ट्रीम्स आहेत; जे या कूपच्या आधुनिकतेवर भर देतात.
 • या एसयूव्हीमध्ये २० इंचाचे जेट ब्लॅक एम लाईट एलोय व्हील्स, डबल-स्पोक ६९९ एम मिक्स्ड टायर्स २४५/४५ आर २० आणि मागच्या बाजूस २७५/४० आर २० बसवलेले आहेत.
 • एम स्पोर्ट ब्रेक्स लाल हाय ग्लॉस कॅलिपरसोबत उपलब्ध आहेत.
 • एम इंटिरियर ट्रिम फिनिशर्सचे कार्बन फायबर सर्वांत पहिल्या BMW X4 M40i च्या कॉकपिटमध्ये मोटार स्पोर्टचे वातावरण सुनिश्चित करण्याचे काम करतो.
 • पॉवर विंडोसाठी कंट्रोल एलिमेंट्सवर विशेष गॅल्व्हॅनिक एम्बिलिशचा वापर केला आहे. त्याचसोबत, स्टिअरिंग व्हीलवरील मल्टिफंक्शन बटणे, दरवाजाचे कंट्रोल पॅनेल आणि दरवाजाचे लॉक स्विच आपली एक वेगळी छाप सोडून जातात.
 • या बीएमडब्ल्यू X4 M40i मध्ये अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
 • कोणत्याही परिस्थिती सुरक्षेच्या दृष्टीने सहा एअरबॅग्स प्रवाशांचे रक्षण करते. त्याचसोबत अटेंटिव्हनेस असिस्टन्स आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC) यांच्यासोबत कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (CBC) उपलब्ध आहेत. ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, साईड इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल इममोबिलाइजर आणि क्रॅश सेन्सर उपलब्ध. लहान मुलांसाठी ISOFIX चाईल्ड सीट माउंटेनिग आणि लोड फ्लोअरखाली गरज पडल्यास इमर्जन्सी स्पेअर व्हील उपलब्ध आहे.

अशी ही बीएमडब्ल्यूची X4 M40i लक्झरी एसयूव्ही गाडी विक्रीसाठी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून, त्याचे बुकिंग बीएमडब्ल्यूच्या ऑनलाइन दुकानांमध्ये करता येऊ शकते. आता या गाडीची किंमत किती आहे? तर BMW X4 M40i या लक्झरी एसयूव्ही गाडीची किंमत [एक्स शोरूम] ९६.२ लाख इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the price and features of new bmw x4m40i in india check out the details dha

First published on: 29-11-2023 at 17:37 IST
Next Story
वाहने चार्जिंग व्यवसायवाढ; वाहनांच्या चार्जिंग व्यवसायात टाटा पॉवरची मोठी गुंतवणूक