News Flash

गंमत कोडी

कधी गोलमगोल , तर कधी लंबगोल कधी कच्चा, कधी भाजी

bal03  कधी गोलमगोल
तर कधी लंबगोल
कधी कच्चा, कधी भाजी
कधी सॉस, तर कधी कोशिंबिरीत
रंग माझा लाल, आवडीने सगळे खाल
प्यायलेत माझे सूप तर होईल सुंदर रूप !
(टोमाटो )

bal06फिकट अबोली रंगाचे फळ
बी मध्ये लपलेला मेवा
जीवनसत्त्वाचा अपार ठेवा
झाडापासून या डिंक निघतो
त्याला आपण ‘चेरीगम’ म्हणतो
बियांचे तेल गुणकारी
मुरंबा खा वा फळे ताजी
झाडाचे लाकूड सुंदर भारी
कलाकुसरीचे सामान घरी-दारी!
( जरदाळू )

bal05
पिवळसर चॉकलेटी रंग
मी आहे एक अद्भुत कडधान्य
अन्नधान्यात पूरक मी
तेलही माझे उपयोगी
रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो
आरोग्य चांगले राखायला मदत करतो
(सोयाबिन)

bal11चक्र माझे भरभर चालते
मी एक यंत्र साधे सोप्पे
कुटिर उद्योगास उपयोगी
कापसातून धागे बनवितो
गांधीजींनी केला माझा प्रसार
देशाभिमानी खादी मीच विणतो.
(चरखा)

bal10मी एक पाहुणा काही दिवसांचा
कधी आशेचा, कधी निराशेचा
नेमाने माझे रूप बदलतो
जाताना नवीन आशा देऊन जातो
तुम्ही मला आनंदाने निरोप देता
दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही
तेवढय़ाच जोशात करतात!
(नवीन वर्ष ) 
ज्योती कपिले jyotikapile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 12:59 am

Web Title: poem for kids 2
टॅग : Poem
Next Stories
1 सियोना आणि मेणबत्त्या
2 आर्ट कॉर्नर : नाताळचे शुभेच्छाझाड
3 डोकॅलिटी :