बालमित्रांनो, खालील आकृतीतील पिवळ्या गोलांमधील A, B, C, D या अक्षरांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. लागा तर मग कामाला! स्पष्टीकरण ह्ण उदाहरण म्हणून पिवळ्या गोलातील २४ ही संख्या बघा. या पिवळ्या गोलाला १३ व १५ हे निळे गोल जोडलेले आहेत. खालीलप्रमाणे निळ्या गोलातील अंकांची बेरीज करून घेऊ. या दोन बेरजांचा गुणाकार म्हणजे पिवळ्या गोलातील संख्या. १३ह्ण १+३ = ४ १५ह्ण१+५ = ६ आणि ४ x ६ = २४ (पिवळ्या गोलातील संख्या) हीच रीत वापरून कुठल्याही पिवळ्या गोलातील संख्या काढता येईल.