देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असला तरी माध्यमे बदलास तयार नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वक्तव्य माध्यमांसाठी प्रमाणापत्रच आहे. कारण प्रत्येक राजकीय पक्षास सत्ता मिळाली की माध्यमांची अडचण वाटू लागते आणि याच राजकीय पक्षांवर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली की हीच माध्यमे त्यांना लोकशाहीचा आधारस्तंभ वाटू लागतात. जेटली यांना हे टोचत असेल तर यात दोष माध्यमांचा नाही तर जेटली यांच्या सत्तेचा आहे. असे ‘अजून येतो वास फुलांना’ या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

माध्यमांचे न बदलणे जेटली यांना टोचत असेल किंवा ते माध्यमांवर संतापले असतील तर त्याचे स्वागत करणेच आवश्यक असल्याचे मत मांडून माध्यमांचे हे फुलणे जेटलींसाठी सोयीचे नसले तरी लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन या अग्रलेखात करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.