sandipmeshram‘‘विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणारा उपक्रम. अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमामध्ये अनेक वेळा तांत्रिक लेखनावर भर असतो. मात्र सामाजिक विषयांशी या शाखेच्या विद्यार्थ्यांची ओळख होणेही गरजेचेच आहे. अनेक विद्यार्थीही विविध विषयांचा अभ्यास करत असतात, त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचेही असते. मात्र तांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांना अशी व्यासपीठे कमी मिळतात. त्याचप्रमाणे अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची ओळख शिक्षक म्हणून आम्हालाही होईल. स्पर्धेचे
स्वरूप असल्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर विषयांची ओळख करून घेणे, त्यांचाही अभ्यास करणे याकडे विद्यार्थी वळतील. त्यासाठी ब्लॉग हे माध्यम कागद-पेनापेक्षा जास्त प्रभावी आहे. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतीलच, पण शिक्षक म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत सहभागी होणे त्यांच्यासाठीच उपयोगी ठरणारे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास अशा उपक्रमातूनच होत असतो.’’ – संदीप मेश्राम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’