Raghuram Rajan On India Growth Path : भारताला त्याच्या विकासाच्या मार्गावर अंतर्गत सामर्थ्यांचा फायदा उठवणे आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये सर्वांसाठी सहिष्णुता आणि आदराची ऐतिहासिक संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे, असं मत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. उदारमतवादी लोकशाहीच्या माध्यमातून भारताला जगाचा विश्वास संपादन करण्याची संधी आहे. भारतामध्ये सेवा क्षेत्रात जागतिक लीडर बनण्याची क्षमता आहे. भारताने लीडरची भूमिका बजावण्यासाठी जगाचा विश्वास जिंकण्यासाठी देशाच्या उदारमतवादी लोकशाही मूल्यांना बळकटी देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलावीत, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. शुक्रवारी ते बोलत होते.

चीनबरोबरच्या स्पर्धेसाठी ‘या’ गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

चीनसारख्या स्वस्त उत्पादनाशी स्पर्धा करण्यासाठी भारताने काही बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून उत्पादन किंवा सेवेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी
congress president kharge writes to modi asking stand on reservation
आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा – खरगे यांचे पंतप्रधानांना दुसरे पत्र
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी

हेही वाचाः RuPay द्वारे आता सर्वत्र करता येणार पेमेंट; NPCI ची Visa-Master ला टक्कर देण्याची तयारी

जगाचा विश्वास जिंकणे आवश्यक

पीटीआयच्या वृत्तानुसार, जर आपल्याला सेवा आधारित विकासाचा मार्ग अवलंबायचा असेल, तर आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था, आपली उदारमतवादी लोकशाही हे फायदे देऊ शकते. जगाचा विश्‍वास जिंकण्यासाठी आंतरिक पातळीवर हे आवश्यक आहे. आम्हाला लोकशाही हवी आहे, पण जगाने विश्वास ठेवू शकेल, अशी खात्री देणारी लोकशाहीही हवी असल्याचंही रघुराम राजन यांनी अधोरेखित केलं आहे.

हेही वाचाः २२ व्या वर्षी सुरू केला बिझनेस अन् २६ व्या वर्षी बनला अब्जाधीश, आज ‘या’ मुलाच्या आवतीभोवती १५०० कर्मचाऱ्यांचा गराडा

राजन यांनी ग्लोबल लीडर कसे बनायचे ते सांगितले

रघुराम राजन म्हणाले की, देशाचे लक्ष लोकशाहीवर असले पाहिजे आणि चिप्ससारख्या आधीच अस्तित्वात असलेल्या वस्तूंच्या निर्मितीच्या पलीकडे पाहिले पाहिजे. जर तुम्ही एका वर्षात १०,००० उच्च दर्जाचे अभियंते तयार केले तर आम्ही चिप डिझाइनमध्ये ग्लोबल लीडर म्हणून उदयास येऊ शकतो.