Gold-Silver Price Today: सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ सुरूच आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. काही केल्या सोनं कमी होताना दिसत नाही. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अशा स्थितीमुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे. 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,४११ असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,२१५ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,३२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Gold Silver Price
Gold-Silver Price: सणासुदीच्या दिवसांत घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
Gold Silver Price
Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक थक्क
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याच्या दराने बाजारपेठेत उडवली खळबळ, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत वाचून फुटेल घाम
Gold-Silver Price
Gold-Silver Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले? मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?
MHADA, expensive houses, flat Worli,
मुंबई : म्हाडाची अल्प गटात महागडी घरे, वरळीतील सदनिका २.६२ कोटींची; मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजार रुपये

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,७७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७७८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.