Gold-Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांचा खिसा जास्त कापला जात असून खरेदीवर जास्त किंमत मोजावी लागत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,९६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९२,१३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९०,७६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 

Costliest Cities To Live, Mumbai Ranking
सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई आशियातून २१ व्या स्थानावर, पुण्यासह अन्य शहरं कितव्या स्थानी?
Gold Silver Price on 17 June 2024
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने बाजारात केला कहर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत 
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ! मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
tesla shareholders okay ceo elon musk s rs 4 67 lakh crore pay package
मस्क यांच्या ४४.९ अब्ज डॉलर वेतनमानास ७७ टक्के भागधारकांची मंजुरी
india exports increased by 9 percent in may
निर्यात ९ टक्क्यांनी वधारून ३८.१३ अब्ज डॉलरवर
india wholesale inflation rate at 15 month high in may 2024
घाऊक महागाई दर १५ महिन्यांच्या उच्चांकी; मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर; किरकोळ महागाईच्या विपरीत वाट
finance ministry seeks suggestions from trade and industry bodies for upcoming union budget
अर्थसंकल्पापूर्वी व्यापारी आणि उद्योग वर्गाकडून सूचनांची मागणी
bajaj housing finance files drhp for rs 7000 crore ipo
बजाज हाऊसिंग फायनान्सचा ‘सेबी’कडे ७,००० कोटींच्या ‘आयपीओ’साठी प्रस्ताव
mumbai share market pm narendra modi
Sensex नं पुन्हा मोडला विक्रम; सलग चौथ्या दिवशी मोठी झेप; निफ्टीचाही नवा उच्चांक!

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,८३५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,८२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,८२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,८२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,८२० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.