नैसर्गिक वायू, पोलाद, कोळसा आदी क्षेत्रात वाढती मागणी राहिल्याने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये देशाच्या प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये १२.१ टक्के दराने वाढ नोंदली गेल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या सप्टेंबर महिन्यात प्रमुख क्षेत्रांनी ९.२ टक्के वाढ नोंदवली होती, तर गेल्यावर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रमुख क्षेत्रांनी केवळ ०.७ टक्के वाढ साधली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खते वगळता कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि वीज या सात प्रमुख क्षेत्रांचा विस्तार झाला आहे. यापैकी कोळसा, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनात दोन अंकी वाढ नोंदवली गेली आहे. सिमेंटचे उत्पादन सप्टेंबरमधील ४.६ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये वार्षिक १७.१ टक्क्यांनी वाढले, तर वीज उत्पादनात सप्टेंबरमधील ९.९ टक्क्यांवरून वार्षिक २०.३ टक्के वाढ झाली. त्यापाठोपाठ कोळसा १८.४ टक्के आणि पोलाद उत्पादन ११ टक्क्यांनी विस्तारले आहे.

हेही वाचा… वित्तीय तूट पहिल्या सात महिन्यांत ८.०४ लाख कोटींवर

एप्रिल-ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांत प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ ८.६ टक्के राहिली आहे. जी वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत ८.४ टक्के अशी होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major sectors of the country expand business by 12 1 percent in october print eco news asj
First published on: 02-12-2023 at 10:24 IST