केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी देशाची वित्तीय तूट एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यांच्या कालावधीत ८.०४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ४५ टक्के आहे. याआधीच्या महिन्यापर्यंत वित्तीय तूट ७.०२ लाख कोटी रुपये होती. वर्षभरापूर्वी याच कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये वित्तीय तुटीचे प्रमाण तत्कालीन अंदाजाच्या तुलनेत ४५.६ टक्के राहिले होते. केंद्र सरकारने संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, तूट १७.८७ लाख कोटी रुपये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ५.९ टक्के मर्यादेत राखली जाणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलग तिसऱ्या महिन्यात केंद्राची वित्तीय तूट मागील वर्षाच्या तुलनेत कमी होती. ऑक्टोबरमध्ये ती १.०२ लाख कोटी रुपये होती, जी दरवर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी होती. तथापि, केंद्राच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आकुंचन पावल्यामुळे वित्तीय तूट कमी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारचा एकूण खर्च १४ टक्क्यांनी कमी होऊन २.७५ लाख कोटी रुपये झाला आहे, तर भांडवली खर्च १५ टक्क्यांनी कमी होऊन ५६,२९६ कोटी रुपये राहिला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fiscal deficit reached at 8 04 lakh crore in first seven months print eco news asj
First published on: 02-12-2023 at 09:20 IST