मुंबई : साबण आणि गृहोपयोगी वस्तूंपासून ते गृहनिर्माण क्षेत्रापर्यंत पसरलेल्या १२७ वर्षं जुन्या गोदरेज समूहाच्या संस्थापक कुटुंबीयांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयावर बुधवारी शिकामोर्तब केले. गोदरेज कुटुंबाने मंगळवारीच गोदरेज कंपन्यांमधील त्यांच्या भागभांडवलाच्या मालकीची पुन:संरचना जाहीर केली होती. त्याचे समूहातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारच्या व्यवहारात संमिश्र परिणाम दिसून आले.

हेही वाचा >>> नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध

stock market fell closed
एनडीएला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात पडझड, ७२ हजारांच्या पातळीवर बंद
adani group shares jump 12 percent as exit polls indicate nda victory
‘मोदी ३.०’ विजयाच्या अंदाजाने अदानी समूहातील समभागांमध्ये तेजीचे वारे; कंपन्यांचे बाजारमूल्य हिंडेनबर्ग-झळ झटकून पूर्वपदावर
adani group companies share surge
लोकसभेच्या निकालाआधी अदाणी समूहाचे शेअर्स वधारले; गौतम अदाणी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
india s fy24 fiscal deficit hits rs 16 54 lakh crore
भारताची वित्तीय तूट १६.५४ लाख कोटींवर; सरत्या आर्थिक वर्षातील स्थिती; जीडीपीच्या ५.६ टक्क्यांवर
Adani group companies profits
अदानी समूहातील कंपन्यांचा नफा वर्षागणिक ५५ टक्के वाढीसह ३०,००० कोटींपुढे
rbi imposes business restrictions on two edelweiss group firms
नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी दोषारोप असलेल्या एडेल्वाईस समूहातील दोन कंपन्यांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
Cosmos bank Small Business Loan Scheme
छोट्या व्यावसायिकांना २,००० कोटींच्या कर्ज वितरणाचे ‘कॉसमॉस बँके’चे लक्ष्य
share market update sensex falls 220 point nifty stable below 22900
निकालाआधी नफावसुलीला प्राधान्य…; ‘सेन्सेक्स’ची २२० अंशांची पीछेहाट

समूहाच्या झालेल्या दुभाजनांत, भांडवली बाजारात सूचिबद्ध गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाइफसायन्सेस या पाच कंपन्यांचा एक विभाग केला गेला आहे, ज्याची मालकी नादिर गोदरेज यांच्याकडे आणि तेच त्याचे अध्यक्ष असतील. या सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांवर विभाजनाच्या करारावर वाढ-घटीचे प्रतिक्रिया उमटली.

हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर

गोदरेज इंडस्ट्रीजचा समभाग ७ टक्क्यांहून अधिक घसरला. हा समभाग मुंबई शेअर बाजारात ७.१५ टक्क्यांनी म्हणजेच ६८.६५ रुपयांनी घसरून ८९२ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८७३.४५ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. गोदरेज प्रॉपर्टीजचा समभाग दिवसभरात ४.३७ टक्क्यांनी म्हणजेच ११५.७५ रुपयांनी घसरून २५३२.८० रुपयांवर स्थिरावला. ॲस्टेक लाइफसायन्सेसचा समभागदेखील २.९२ टक्क्यांनी घसरून प्रत्येकी १,२५० वर आला. सुरुवातीच्या सत्रात त्याने जवळपास ९ टक्क्यांची झेप घेत १,४०० रुपयांची पातळी गाठली होती. या पडझडीला गोदरेज ॲग्रोव्हेटचा समभाग मात्र अपवाद राहिला. दिवसभरात तो ५.५८ टक्क्यांनी वाढून ५७५.०५ रुपयांवर गेला होता. तथापि दिवसअखेर ३.५८ टक्क्यांनी वाढून ५६४.१५ रुपयांवर बंद झाला. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा समभाग १.११ टक्क्यांनी वाढून १,२३३ रुपयांवर बंद झाला.